येणारे वर्ष हे केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार अशी एक स्थिती असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये काही महत्त्वाचे बदल दिसण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या जो काही महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे
त्यामध्ये येणाऱ्या वर्षात पुन्हा वाढ होईल अशी शक्यता आहे व पुढील वेतन आयोगाबाबत देखील अपडेट येण्याची एक दाट शक्यता आहे. परंतु कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या फिटमेंट फॅक्टरबद्दल देखील काही महत्त्वाची अपडेट येण्याची देखील शक्यता आहे.
महागाई भत्त्यात होऊ शकते चार
ते पाच टक्क्यांची वाढजानेवारी 2024 मध्ये महागाई भत्तात चार ते पाच टक्क्यांची वाढ दिसून येईल. जर असे झाले तर उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपयांपेक्षा जास्तीची पगार वाढ मिळणार असून त्याचा फायदा एक कोटींपेक्षा अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 46% इतका महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळत असून केंद्र सरकारच्या माध्यमातून जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्त्यात चार ते पाच टक्क्यांची वाढ करण्याची देखील एक शक्यता आहे.
महागाई भत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एआयसीपीआय निर्देशांकाची सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी जाहीर झालेली असून त्यानुसार आतापर्यंत महागाई भत्त्यामध्ये 2.50 टक्क्यांची वाढ झालेली आहे. सध्याचा जर महागाई भत्त्याचा स्कोर पाहिला तर तो 48.54 टक्क्यांवर आहे. अशा स्थितीत सर्व योग्य राहिल्यास जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता हा 51% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टर देखील वाढू शकतो
याबाबत एक महत्त्वाची अपडेट असे की फिटमेंट फॅक्टर देखील वाढवला जाण्याची चर्चा असून जर असे झाले तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. जरी सातव्या वेतन आयोग अंतर्गत फिटमेंट फॅक्टर वाढला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 8860 रुपयांची वाढ होणार आहे.
सध्या हा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका असून जर त्यामध्ये 3.68 पर्यंत वाढ झाली तर लेव्हल 1 च्या ग्रेड पे ची किमान मर्यादा 26 हजार रुपये होईल व पगारांमध्ये थेट आठ हजार रुपयांची वाढ होईल. याबाबत उदाहरण घेतले तर लेव्हल एक वर ग्रेड पे एक हजार आठशे रुपये व कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर भत्ते वगळून फिटमेंट फॅक्टर नुसार गणना केलेला पगार हा 18000×2.57= 46 हजार दोनशे साठ रुपये असेल.
परंतु जर यामध्ये 3.68% पर्यंत वाढ झाली तर पगार 26000×3.68= 95 हजार 680 पर्यंत होईल. म्हणजेच एकूण पगारातील फरक हा 49,420 रुपयांचा असेल. संबंधित आकडेवारी ही मूळ वेतनावर आहे. त्यामुळे जास्त पगार असलेल्या लोकांना जास्त फायदा मिळू शकतो.
फिटमेंट फॅक्टर कशाला म्हणतात?
हा एक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्याचा फार्मूला असून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये वाढ होत असते. फिंटमेंट फॅक्टर या अगोदर 2016 मध्ये वाढवण्यात आला होता व तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 6000 रुपयांवरून थेट 18 हजार रुपये इतके करण्यात आले होते.
सध्या फिटमेंट फॅक्टर हा 2.57 इतका आहे. या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवताना सर्व भत्ते वगळून कर्मचाऱ्यांच्या मूलभूत घटकाची गणना ही फिंटमेंट फॅक्टर 2.57 गुणाकार करून केली जाते.