गुंतवणुकी करिता जे वेगवेगळे पर्याय गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी वापरले जातात. त्यामध्ये बँकांच्या मुदत ठेव योजनांना जास्त प्रमाणात गुंतवणूकदारांकडून पसंती दिली जाते. यासोबत पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असते.
यामागील प्रामुख्याने कारण पाहिले तर ते हे आहे की या योजना सरकारी योजना आहेत. तसेच या ठिकाणी केलेली गुंतवणूक सुरक्षित राहतेच व परतावा देखील चांगला मिळतो. सरकारच्या बऱ्याच योजना या अल्पबचत योजना आहेत व यामध्ये आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ, किसान विकास पत्र योजना आणि मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना या काही योजना खूप महत्त्वाच्या आहेत
या योजनांमध्ये जास्त करून गुंतवणूक केली जाते. महत्वाचे म्हणजे या अल्पबचत योजनांच्या व्याजदरामध्ये प्रत्येक आर्थिक वर्षाच्या तिमाहीमध्ये व्याजदरात बदल केला जातो. या अनुषंगाने एक एप्रिल 2024 पासून सुरु होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाबाबत काही माहिती समोर आली आहे. ती काय आहे?हे आपण या लेखात जाणून घेऊ.
अल्पबचत योजनांच्या व्याजदरामध्ये सरकारने केला का बदल?
सरकारच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सारख्या अल्पबचत योजनांच्या मध्ये गुंतवणूक वर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणजेच अगोदर जे व्याजदर होते तेच व्याजदर कायम राहणार आहे.
महत्वाचे म्हणजे याबाबत महत्त्वाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून शुक्रवारी जारी करण्यात आली. या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे की, ज्या काही विविध अल्पबचत योजना आहेत त्यावर मिळणारा व्याजदर 2024-25 या आर्थिक वर्षाची पहिली तिमाही म्हणजेच एप्रिल ते जून आणि चौथ्या तिमाहीकरिता म्हणजेच (जानेवारी ते मार्च 2024) पर्यंत अधिसूचित दराप्रमाणेच असतील. म्हणजेच व्याजदरांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही.
सध्या कुठल्या योजनेत किती मिळत आहे व्याज?
1- सुकन्या समृद्धी योजना-
सध्या या अल्पबचत योजनेवर सर्वाधिक व्याज मिळत असून साधारणपणे या योजनेत जमा केलेल्या रकमेवर 8.2% व्याज मिळत आहे. ही एक अल्पबचत योजना असून मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना आहे. दहा वर्षाखालील मुलींचा या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतील गुंतवणुकीचे स्वरूप बघितले तर ते वर्षाला कमीत कमी 250 इतर जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत आहे.2- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ- सध्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.1% दराने व्याज मिळत असून या योजनेच्या माध्यमातून लोकांना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बचत करता यावी यासाठी ही योजना मदत करते. तसेच कर बचतीकरिता देखील पीपीएफ ही योजना खूप फायद्याची आहे.
3- किसान विकास पत्र- ही योजना देखील एक खूप फायद्याची योजना असून सध्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.5% व्याजदर आहे. या योजनेत केलेली गुंतवणूक ही 115 महिन्यांमध्ये परिपक्व होते. कमीत कमी एक हजार रुपयांपासून या योजनेमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करता येते व जास्तीत जास्त ठेवीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. या योजनेत ठेवलेली ठेव आणि त्यावर मिळणारे व्याज हे करमुक्त आहे.