आर्थिक

Chanakya Niti: व्यवसाय यशस्वी करून लाखो रुपये कमवायचे असतील तर आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 5 गोष्टींचा करा अवलंब! होईल फायदा

Chanakya Niti:- नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही बाबींचा विचार केला तर आता नोकरीचे प्रमाण नगण्य असल्यामुळे बहुतांश तरुण-तरुणी आता व्यवसायाकडे वळताना दिसून येत आहेत. अनेक छोटे-मोठे व्यवसाय उभारून त्या माध्यमातून उतरनिर्वाहाचे साधन निर्माण करणे ही आता काळाची गरज आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला यशस्वी करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रयत्नातील सातत्य तसेच कष्ट, सततचा अभ्यास आणि यशस्वीतेसाठी इतर महत्त्वाच्या बाबी खूप आवश्यक असतात.

त्याच पद्धतीने तुम्हाला व्यवसाय देखील यशस्वी करायचा असेल तर त्याकरिता बाजारपेठेचा अभ्यासापासून  व्यवसाय वाढीसाठी करावे लागणारे महत्त्वाचे व्यवस्थापन आणि सततचा व्यवसाय वाढीसाठीचा प्रयत्न खूप गरजेचा असतो. परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे देखील पालन करणे तितकेच गरजेचे असते.

या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आचार्य चाणक्य  यांनी व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल किंवा तो चांगल्या पद्धतीने हाताळायचा असेल तर कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या गोष्टी करू नयेत याबद्दल महत्त्वाचे सांगितले आहे. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये व्यवसाय वाढीसाठी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या लेखात बघणार आहोत.

 व्यवसायाच्या यशासाठी आचार्य चाणक्यांच्या महत्त्वाच्या पाच गोष्टी

1- समाजातील लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा आचार्य चाणक्य याबाबतीत म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही पद्धतीचे काम सुरू करतात तेव्हा सुरुवातीला तुम्हाला अनेक लोक भेटतात व ते त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात.

अशा लोकांबद्दल बोलताना आचार्य चाणक्य म्हणतात की नकारात्मक लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देणे गरजेचे नाही. तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करत राहणे खूप महत्त्वाचे आहे व या माध्यमातूनच तुम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास ठेवून कामांमध्ये पूर्ण स्वतःला झोकुन देत काम करत राहणे खूप गरजेचे आहे.

2- फायदे आणि तोटे याचा अभ्यास त्याबद्दल बोलताना आचार्य चाणक्य नमूद करतात की, तुम्ही जे काही काम किंवा व्यवसाय सुरू करणार आहात त्याबद्दल तुम्हाला चांगली माहिती असणे सर्वप्रथम गरजेचे आहे. तसेच व्यवसाय करिता असलेले ठिकाण योग्य असणे तसेच स्पर्धा इत्यादी बाबत संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या व्यवसायाविषयी असलेले मार्केट व्यवस्थित समजून घ्या व त्याशिवाय तुमच्याकडे संपूर्ण बिझनेस प्लॅन असणे गरजेचे आहे.

म्हणजेच तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नेमके काय करायचे आहे याबद्दलची तुमची दृष्टी अगदी स्पष्ट असणे गरजेचे आहे. तसेच व्यवसायातील फायदे आणि तोटे यांचे मूल्यांकन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे देखील आचार्य चाणक्य नमूद करतात. तसेच पुढे म्हणतात की जर काही कारणास्तव तुमचा व्यवसाय डबघाईला येत असेल किंवा चालत नसेल तर तुम्ही तोटा सहन करू शकाल का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणे खूप गरजेचे आहे. व्यवसायाच्या बाबतीमध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याविषयी तुमचे समाधान झाल्यानंतर तुम्ही व्यवसायाला किंवा कामाला सुरुवात करा व त्यासोबत नेहमी दुसरा एक पर्याय तुमच्यासोबत ठेवा.

3- कुठली माहिती इतरांना देऊ नका तुम्ही एखादा व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्याची माहिती तुम्ही इतरांना अजिबात देऊ नका. जर तुम्ही तुमच्या कामाची किंवा व्यवसायाची माहिती इतरांना दिली तर असे बरेच लोक आहेत की जे तुमचा द्वेष करतात. या लोकांना तुमचे एखादे नवीन काम किंवा व्यवसाय माहिती पडल्यावर ते तुमच्या कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एखादे नवीन व्यवसाय किंवा कामाची कुठलीही माहिती इतरांना देऊ नये.

4- काम मेहनतीने समर्पणाने करा जर तुम्ही एखादे काम किंवा व्यवसाय सुरू केला असेल तर त्यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून द्या व कामाचा पाठपुरावा करा. इतर लोक काय म्हणतात याच्याने प्रभावित होऊन काम थांबवू नका. जसे रोपाचे रूपांतर वृक्षात होण्यासाठी वेळ लागतो अगदी त्याच पद्धतीने व्यवसाय वाढीसाठी देखील थोडा वेळ लागेल.

म्हणून तुम्ही त्याकरिता संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. तुमच्या कामावर तुमचा विश्वास ठेवा आणि मेहनतीने व समर्पणाने ते करा. तसेच पुढे आचार्य चाणक्य म्हणतात की यशस्वी होण्याकरिता व पुढे जाण्यासाठी कधी कधी काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात व ते निर्णय घेऊन धोका देखील पत्करावा लागतो.

5- इतरांशी विनम्र आणि गोड बोला जर तुमची वाणी म्हणजे तुमचे बोलणे चांगले विनम्र आणि गोड असेल तर कोणतेही काम तुम्ही सहजपणे आरामात पूर्ण करू शकता. व्यवसाय करताना नेहमी लक्षात ठेवा की कडवट बोलणारे लोक कधीच व्यवसाय करू शकत नाहीत. तुमचा व्यवहार विनम्र आणि बोलणे गोड असेल तर तुम्ही इतर लोकांशी  तुमचे गोड बोलण्यामुळे तुम्ही लोकांशी स्वतःला जोडू शकतात आणि त्यातून तुमच्या व्यवसायाची वाढ करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts