LIC Scheme : LIC ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून आपल्या ग्राहकांसाठी अनके योजना चालवल्या जातात, ज्या त्यांच्या गरजा लक्षात घेऊन बाजरात आणल्या गेल्या आहेत. अशातच LICने देशातील नागरिकांसाठी अशाच दोन खास योजना आणल्या आहेत. ज्याद्वारे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. एलआयसीने यावर्षी अशा दोन योजना आणल्या आहेत लोकांना श्रीमंत जया लोकांना श्रीमंत करत आहेत.
या योजनांचे अनेक फायदे आहेत, याअंतर्गत लोकांना आकर्षक व्याजदरही दिले जात आहेत. आजच्या या बातमीद्वारे आपण LICच्या याच खास योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या बंपर रिटर्न्स देत आहेत.
जीवन शांती योजना
LIC कडून चालवली जात असलेली जीवन शांती योजना लोकांना उत्तम आकर्षक व्यजदार ऑफर करत आहेत, LICने नुकतेच जीवन शांती योजनेत विशेष बदल केले आहेत. LICने या योजनेच्या व्याजदरात वाढ केली असून. या योजनेवर ग्राहकांना उत्तम परतावा मिळत आहे. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेसह, पॉलिसीधारकांना सिंगल आणि जॉइन केलेल्या खात्याअंतर्गत एन्युटी निवडण्याचा पर्यायही दिला जातो.
एलआयसी जीवन आझाद योजना
LIC ची जीवन आझाद ही एक वैयक्तिक आणि बचत जीवन विमा योजना आहे. या योजनेत सुरक्षितता आणि बचतीचीही सुविधा उपलब्ध आहे. या योजनेकडे, हे मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना म्हणून पाहिले जाते.
या योजनेत गुंतवणूक केल्यावर, पॉलिसी धारकासोबत कोणतीही वेळी कोणतीही घटना घडल्यास, कुटुंबाला हमी मदत मिळते. तसेच विमाधारक व्यक्तीला परिपक्वतेवर एकरकमी पेमेंटचीही हमी दिली जाते.