Cibil Score Tips:- तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक गरजेच्या वेळी कर्ज घेण्याची गरज भासते. त्यामुळे बरेच जण बँकांचा आधार घेतात व या माध्यमातून पर्सनल लोन घेऊन आपल्या जीवनातील आर्थिक गरजा भागवतात. तसेच नवीन घर खरेदी करण्यासाठी देखील होमलोनच्या माध्यमातून पैसा उभा केला जातो.
परंतु आपल्याला माहित आहे की कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कर्ज हवे असेल तर तुमचा सिबिल स्कोर सगळ्यात अगोदर बँक तपासत असते. या सिबिल स्कोर अर्थात क्रेडिट हिस्टरीवरून तुमची आर्थिक पत कशी आहे हे बँकांना कळते. तुमचा सिबिल स्कोर जितका मजबूत असेल तितके तुम्हाला झटक्यात आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते.
परंतु जर तुम्ही या अगोदर घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड केले नसेल किंवा त्याचे ईएमआय वेळेवर भरत नसाल या व इतर कारणांमुळे जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी झाला असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे कठीण जाते. जर आपण सिबिल स्कोर कमी होण्याच्या कारणाचा विचार केला तर वेळेवर कर्जाची परतफेड न करणे हे कारण जितके महत्त्वाचे आहे
तितकेच तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यासंबंधीच्या काही चुका देखील तुमच्या क्रेडिट स्कोरवर विपरीत परिणाम करतात. नेमकी याबद्दल कोणती चूक आपला क्रेडिट स्कोर कमी करू शकते. याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
क्रेडिट कार्डच्या वापराने सिबिल स्कोर कमी कसा होऊ शकतो?
आता बरेच जण क्रेडिट कार्ड वापरतात. बऱ्याच वस्तू या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ईएमआय वर खरेदी केल्या जातात. अशावेळी क्रेडिट कार्डचा वापर वाढतो. यामुळे देखील तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो. हे जर तुम्हाला उदाहरणावरून समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड वर 50 हजार रुपयांचा लिमिट असेल व या लिमिटसह तुम्ही 40 हजार रुपये किमतीची वस्तू खरेदी केली
व या खरेदी केलेल्या वस्तूचा ईएमआय पाच हजार रुपये असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही केलेल्या क्रेडिटचा वापर त्या वस्तूच्या किमतीच्या बरोबरीचा म्हणजेच 40 हजार रुपये इतका मानला जातो. अशा प्रसंगी तुम्ही संबंधित ईएमआय जरी वेळेवर भरले तरी देखील त्याचा विपरीत परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होतो. अशावेळी तुम्ही तुमचा ईएमआय बनवताना क्रेडिटचा वापर नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्डवरील क्रेडिट लिमिटचा वापर किती करावा?
तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल व तुम्हाला क्रेडिट स्कोर चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड वरील दिलेल्या लिमिटच्या 30% पेक्षा कमी खर्च करणे गरजेचे आहे. हे प्रमाण उत्तम सिबिल याकरिता योग्य मानला जातो. तसेच तुम्हाला क्रेडिट स्कोर उत्तम ठेवायचा असेल तर क्रेडिट युटीलायझेशन 10 ते 20% ठेवणे गरजेचे आहे.
क्रेडिट स्कोरचे वर्गीकरण कसे केले जाते?
साधारणपणे क्रेडिट स्कोर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान गणला जातो. यामध्ये जर 750 ते 799 चा क्रेडिट स्कोर असेल तर तो खूप चांगला मानला जातो. तसेच सातशे ते 749 दरम्यानचा क्रेडिट स्कोर चांगले श्रेणीत येतो. 650 ते 699 क्रेडिट स्कोर ठीक मानला जातो. परंतु 650 पेक्षा जर खाली क्रेडिट स्कोर असेल तर तो खराब श्रेणीमध्ये येत असतो.