Credit Card : आजकाल समाजात आपल्याकडे क्रेडिट कार्ड ठवणे हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. तुम्हाला बाजारात क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंट करणारे अनेकजण पहिला देखील मिळत असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो जर एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा वेळेवर पेमेंट केला नाहीतर त्याला बिलसह अतिरिक्त शुल्क देखील भरावा लागतो.
ही बाब लक्षात ठेवता आरबीआयने एक नवीन नियम आणले आहे. ज्यामुळे तुम्ही बिल भरण्याच्या देय तारखेला पैसे भरले नाही तर एका विशिष्ट दिवसापर्यंत तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही चला मग जाणून घ्या आरबीआयच्या या नियमाबद्दल सविस्तर माहिती.
काय आहे RBI चा नवा नियम
आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरण्यास विसरलात, तर विलंब शुल्क न भरता ते तीन दिवसांत भरता येईल. तर तीन दिवसांनंतर विलंब शुल्क भरावे लागेल. क्रेडिट कार्ड कंपनीनुसार विलंब शुल्क भिन्न असू शकते. नियामकानुसार, देय तारखेनंतर देय असलेल्या रकमेवर व्याज, उशीरा पेमेंट फी आणि शिल्लक दंड आकारला जाईल. बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या सामान्यत: थकीत रकमेवर आधारित पूर्व-निर्धारित उशीरा पेमेंट शुल्क आकारतात. यामुळे थकबाकीच्या आकारानुसार विलंब शुल्क वाढते.
UPI पेमेंट क्रेडिट कार्डद्वारे करता येते
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडील नियमांनुसार, RBI ने UPI ला क्रेडिट कार्डशी जोडण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच, आता तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डनेही UPI पेमेंट करू शकाल. यापूर्वी, क्रेडिट कार्ड पेमेंट फक्त इंटरनेट बँकिंग आणि पीओएसद्वारे केले जाऊ शकत होते.
हे पण वाचा :- SBI चा ग्राहकांना मोठा झटका ! आता खात्यातून आपोआप कापले जाणार पैसे; बँकेने बदलला ‘हा’ नियम