Credit Card Loan : देशातील सर्व शहरांमध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर करण्याचे प्रमाण खूप जास्त झाले आहे. अनेकदा क्रेडिट कार्डच्या मदतीने लोक खरेदी करत असतात.
परंतु काहींना ठराविक वेळेत ते कर्ज भरता येत नाही. त्याशिवाय थकीत कर्जामुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो. इतकेच नाही तर क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास ग्राहकांना मोठा दंडही भरावा लागतो. परंतु आता तुम्ही समस्येतून बाहेर पडू शकता.
जास्त खरेदी केल्यामुळे अनेक वेळा क्रेडिट कार्डची थकबाकी इतकी वाढत जाते. त्यामुळे अनेकांसमोर आर्थिक संकट उभे राहते. परंतु क्रेडिट स्कोअर चांगला राहावा यासाठी क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरलेले असावे. ज्यावेळी तुम्हाला नंतर कर्जाची गरज असेल त्यावेळी हा क्रेडिट स्कोअर कामी येतो.
अनावश्यक खर्च टाळा
आता तुमचे क्रेडिट कार्ड आणि इतर खर्चाची यादी पहा. त्यानंतर तुमचे खर्च अत्यावश्यक आणि अत्यावश्यक विभागून घ्या, बचत केलेल्या पैशांचा वापर क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी करा.
कर्जाची परतफेडीसाठी करा हे काम
जर क्रेडिट कार्डवर मोठे कर्ज जमा झाले असल्यास तुम्हाला संपूर्ण कर्जाची परतफेड एकाच वेळी करता येणार नाही. त्यासाठी कर्ज फेडण्याची योजना तयार करा. तुमचा पगार लक्षात घेता खर्चाची रक्कम लक्षात घेऊन तुम्हाला क्रेडिट कार्डमध्ये किती पैसे ठेवता येतील याची एकदा गणना करावी.
बँकेशी करा संपर्क
समजा तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर एकदा बँकेच्या क्रेडिट कार्ड सेवेशी संपर्क करा. ते तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुमच्यासाठी परतफेडीची योजना बनवू शकतील. जर गरज पडली तर आर्थिक तज्ज्ञांचाही सल्ला घेतला जाईल.
क्रेडिट कार्डचा वापर थांबवा
एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी डेबिट कार्ड किंवा रोख रक्कमेचा वापर करा. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर शक्यतो टाळावा. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमची शिस्त पाळली तर तुम्ही लवकरच क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊ शकता.