Credit Card Update:- बरेच जण क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामध्ये क्रेडिट कार्डचा वापर हा अनेक ग्राहक करतात व अनेक महत्त्वाच्या आर्थिक बाबी पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्ड हे खूप महत्त्वाचे असते. परंतु क्रेडिट कार्ड असो किंवा डेबिट कार्ड यासंबंधी अनेक प्रकारचे नियम असतात व ते ग्राहकांना लागू होत असतात. अशा प्रकारचे नियम हे रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून तयार केले जातात व ते ग्राहकांना लागू होत असतात.
त्यामुळे अशा पद्धतीचे नियम ग्राहकांना माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरतो परंतु त्यासंबंधीचे नियम किंवा महत्त्वाच्या बाबी आपल्याला माहितीच नसतात. त्यामुळे हे नियम व त्यामध्ये झालेले बदल आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे व या संदर्भात क्रेडिट कार्ड विषयी रिझर्व बँकेने काही नियमामध्ये बदल केला असून या माध्यमातून आता ग्राहकांना एक नवीन अधिकार मिळाला असून बँक यामध्ये त्यांचे मनमानी नियम ग्राहकांवर लादू शकणार नाहीत.
क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये केला हा बदल
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आरबीआयच्या माध्यमातून क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे संबंधित काही नियमात बदल केले असून या नवीन नियमानुसार विचार केला तर आता कोणतीही बँक मनमानी नियम ग्राहकांवर लादू शकणार नाहीत व ग्राहकांना आता क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड त्यांच्या इच्छेनुसार बनवता येणार आहे.
म्हणजेच एक ऑक्टोबर 2023 पासून आता ग्राहक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड बनवताना स्वतःचा सेवा प्रदाता म्हणजे ज्या कंपन्यांकडून सेवा देण्यात येते त्याची निवड करू शकणार आहेत. म्हणजेच आता ग्राहक ज्या सेवा पुरवठा दराची निवड करतील त्याचेच निवड बँकेला देखील करावी लागणार आहे. याआधी बँकेकडून जो काही सेवा प्रदाता दिला जात होता किंवा निवड केली जात होती याचेच कार्ड आपल्याला मिळत होते.
परंतु आता बँकांना ग्राहकाला विचारावे लागणार आहे व त्यांच्या सल्ल्यानुसार सेवा देणारी कंपनी निवडावी लागणार आहे. आता क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा विचार केला तर यामध्ये सेवा देणाऱ्या कंपन्या म्हणजे व्हिसा किंवा मास्टरकार्ड, रूपे यासारख्या कार्ड नेटवर्क कंपन्या असून यापैकी आता ग्राहक स्वतःच्या मर्जीने निवड करू शकणार आहेत.
सध्या भारतामध्ये पाच कार्ड प्रोव्हायडर कंपनी असून यामध्ये अमेरिकन एक्सप्रेस, बँकिंग कॉर्पोरेशन, डिनर क्लब इंटरनॅशनल लिमिटेड, मास्टर कार्ड( एशिया /पॅसिफिक ),रूपे आणि व्हिसा वर्ल्डवाइड लिमिटेड या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. या पाचही नावांमधून आता ग्राहकांना त्यांचा सेवा प्रदाता निवडता येणार आहे.
या ज्या काही सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत त्या अनेक नेटवर्कच्या सहकार्याने ग्राहकांना पर्याय देतात व अशा परिस्थितीत ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार आता कार्ड नेटवर्क निवडू शकणार आहेत. याबाबतीत रिझर्व बँकेने म्हटले आहे की जेव्हा कार्ड जारी केले जाईल त्या अगोदर द्विपक्षीय करारामध्ये ग्राहकाला त्याची निवड विचारली जाईल व ग्राहक त्याच्या इच्छेनुसार सेवाप्रदात्याची निवड करू शकणार आहे. विशेष म्हणजे ह्या लाभ जुन्या ग्राहकांना देखील मिळणार आहे. जेव्हा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नुतनीकरण किंवा रिन्यूअल करावे लागते तेव्हा त्यांना सेवाप्रदाता निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे.