Bank Offers : दिवाळीपूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका ग्राहकांसाठी एकापेक्षा एक ऑफर आणत आहेत, अशातच काही बँका अशा आहेत ज्यांनी गृहकर्ज आणि कार कर्जावर ऑफर सुरु केल्या आहेत. दरम्यान, आज आपण अशाच तीन बँकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी दिवाळीपूर्वी काही खास ऑफर आणून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिल आहे.
तुम्हीही सध्या सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर देशातील अनेक मोठ्या बँकांनी होम लोनवरभरघोस सूट आणली आहे. तीन मोठ्या बँकांनी ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर आणल्या आहेत. चला अशा बँकांबद्दल जाणून घेऊया या बँका होम लोनवर काय ऑफर देत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाची दिवाळी ऑफर
दिवाळी आणि धनत्रयोदशी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियानेही सणासुदीच्या ऑफर्स आणल्या आहेत. ही ऑफर 1 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली आहे, जी 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना व्याजात मोठी सूट दिली जात आहे. बँक ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित जास्तीत जास्त 65 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.65 टक्के सूट देत आहे.
बँक ऑफ बडोदा दिवाळी ऑफर
या बँकेने ‘फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी’ नावाची मोहीम सुरू केली आहे. जे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये ग्राहकांना सुरुवातीच्या 8.40 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. याशिवाय प्रक्रिया शुल्कही आकारले जात नाही.
पंजाब नॅशनल बँकेच्या दिवाळी ऑफर
पंजाब नॅशनल बँकेनेही आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या ऑफर्स आणल्या आहेत. त्यानुसार, दिवाळी किंवा धन तेरसच्या निमित्ताने गृहकर्ज घेणाऱ्यांना सुरुवातीच्या 8.40 टक्के दराने कर्ज दिले जाईल. कागदपत्रे आणि बँक प्रक्रिया शुल्कातही सूट दिली जात आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही ग्राहक कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच, अधिक माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1800 1800/1800 2021 वर कॉल करू शकता.