DA Hike : केंद्र सरकारकडून मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केली आहे. तसेच येत्या काळात देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. कारण त्यांची पुढील DA वाढ देखील लवकरच होऊ शकते.
केंद्र सरकारच्या DA वाढीनंतर विविध राज्यातील सरकारकडून देखील कर्मचाऱयांच्या DA मध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होत आहे. कर्मचाऱ्यांच्या DA थकबाकीवर देखील सरकारकडून निर्णय घेण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये १६ टक्के वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे.
महागाई भत्ता 16 टक्क्यांनी वाढवला
उत्तर प्रदेश सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये १६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या DA वाढीचा लाभ ५ व्या वेतन श्रेणी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ४१२ टक्के रक्कम महागाई भत्ता म्हणून दिली जाणार आहे.
5 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार
पाचव्या वेतनश्रेणीत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ३९६ टक्के महागाई भत्त्याचा दिला जात होता. मात्र आता याच कर्मचाऱ्यांना एकूण मूळ वेतनावर ४१२ टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे.
कर्मचाऱ्यांचा DA १ जानेवारी २०२३ पासून वाढवला जातो. मात्र यावेळी उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांचा मागील ५ महिन्यांचा DA देखील कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना DA लाभ दिला जाणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. 1 जानेवारी ते 31 मे पर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वर्ग करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
आदेश जारी केले
अर्थ अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत आदेश जारी केला आहे. कर्मचाऱ्यांना १ जानेवारी पासून सुधारित DA चा लाभ दिला जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.