DA Hike:- सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असून या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा असलेला महागाई भत्तावाढीच्या बाबतीत एक गुड न्यूज येण्याची शक्यता आहे. सनासुदीच्या दिवसांव्यतिरिक्त देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका देखील होणार असल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाराज न करता त्यांच्याकरिता महागाई भत्ता वाढ करण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जर आपण केंद्र सरकारचा आतापर्यंतची पद्धत किंवा पॅटर्न पाहिला तर यासंबंधी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक दसऱ्यापूर्वी झालेली आहे व या बैठकीमध्येच महागाई भत्ता वाढीला मंजुरी देण्यात येते. अगदी त्या पद्धतीनेच याही वेळेस महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाईल अशी शक्यता आहे.
15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान महागाई भत्ता वाढीची होईल घोषणा?
जर केंद्र सरकारचा महागाई भत्ता वाढीसंबंधीचा पॅटर्न पाहिला तर त्यानुसार यासंबंधीची घोषणा 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान केव्हाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी दसरा हा 24 ऑक्टोबरला येत असून या अगोदर केंद्र सरकार महागाई भत्ता वाढीची घोषणा करेल.
तसेच महागाई भत्ता वाढीची घोषणा झाल्यानंतर तो एक जुलैपासून लागू होणार आहे. आता यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होते की चार टक्क्यांची वाढ केली जाते हे येणारा काळच ठरवेल. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता दिला जात असून त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली तर 45 टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढेल व चार टक्क्यांची वाढ झाली तर त्यात 46% पर्यंत वाढ होईल.
ऑक्टोबरच्या पगारात होईल वाढ?
महागाई भत्ता जर वाढवला तर ऑक्टोबरच्या पगारांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जो काही थकीत महागाई भत्त्याची रक्कम राहिलेली आहे याची देखील भर पगारामध्ये पडेल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे देशातील 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे.
पाच राज्यातील निवडणुकीच्या घोषणेचा काही परिणाम होऊ शकतो का?
नुकत्याच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मध्य प्रदेश सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. परंतु या जाहीर केलेल्या तारखा किंवा निवडणुकांचा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी वर आधारित ही प्रक्रिया असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही असे देखील या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. कारण महागाई भत्ता वाढ ही कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा सहामाही तत्त्वावर द्यावी लागते.