DA Hike :- केंद्र सरकारच्या एक कोटी पेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई भत्ता आणि डीआर असून याबाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महागाई भत्त्यात आणि डीआरमध्ये चार टक्क्यांची वाढ होणार हे आता निश्चित मानले जात आहे.
जर आपण सध्याच्या केंद्र कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा विचार केला तर तो 42% इतका मिळत आहे. परंतु यामध्ये ऑल इंडिया कंजूमर प्राईज इंडेक्स आणि कंजूमर फूड प्राईस इंडेक्सने जो काही डेटा जारी केलेला आहे त्यानुसार आता यामध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर डी ए आणि डी आर 46 टक्के होण्याची शक्यता आहे व यासंबंधीचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाला घ्यायचा आहे.
सध्याची महागाई भत्त्याची स्थिती आणि अपेक्षित होऊ शकणारी वाढ
सध्या केंद्रीय कर्मचारी आणि बरेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता किंवा इतर लाभ देण्यात येतात ते सर्व सातवा वेतन आयोगानुसार देण्यात येतात. सध्या महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवर असून तो चार टक्क्यांची वाढ झाली तर 46 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. परंतु सध्याची जर आपण देशातील महागाईची स्थिती पाहिली तर त्यावरून 120 दिवसानंतर महागाई भत्ता हा 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे
व या पाठोपाठ बाकीचे भत्ते देखील 25 टक्क्यांनी वाढतील असा एक अंदाज आहे. याबाबतीत महत्त्वाचा असलेला ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार केला तर जुलैमध्ये 3.3 अंकांनी वाढून तो 139.7 अंकांवर पोहोचला होता. यामध्ये महत्त्वाचा असलेला ऑल इंडिया कंजूमर प्राईज इंडेक्स आणि कंजूमर फूड प्राईस इंडेक्स यांचा डेटा पाहिला तर त्यानुसार चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु आता केंद्रीय मंत्रिमंडळ यासंबंधी काय अंतिम निर्णय घेते हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर आपण यामध्ये दिलासा पाहिला तर महागाई भत्त्यात टक्क्यांची वाढ होऊन तो 46% पर्यंत पोहोचेल हे आपल्याला माहिती आहे परंतु 46 टक्क्यांपर्यंत जर महागाई भत्ता पोहोचला तर बाकीचे भत्ते देखील 25 टक्क्यांनी वाढतील. त्यामुळे ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील यामुळे दिलासा मिळत असतो.