DA Hike News : 1 जुलै 2022 पासून, सरकार कधीही सरकारी कर्मचारी (Government employees) आणि पेन्शनधारकांच्या (pensioners) महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रत्यक्षात, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढेल, असा पहिला अंदाज होता. परंतु औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनंतर, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 34 टक्के महागाई भत्ता मिळतो, जो मार्च 2022 मध्ये वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु असे मानले जाते की 2022 च्या उत्तरार्धात महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवून 39 टक्के केला जाऊ शकतो. एप्रिल महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीवरून अंदाज बांधले जात आहेत.
देशातील वाढती महागाई पाहता जुलै महिन्यात सरकार महागाई भत्त्यात (डीए) मोठी वाढ करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्यांचा पगार 8,000 रुपयांवरून 27,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. साधारणत: 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याचा ट्रेंड आहे, अशा परिस्थितीत जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळू शकते.
केंद्र सरकार किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करते. देशातील महागाई RBI च्या अंदाजापेक्षा वर पोहोचली आहे. किरकोळ महागाई RBI च्या सहनशीलतेच्या 6 टक्क्यांच्या वर गेली आहे.