DA Hike : महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. कारण केंद्र सरकारकडून लवकरच या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा फायदा फक्त सरकारी कर्मचारी नाही तर पेन्शनधारकांना होणार आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 42 टक्के मिळत असून असून आता त्यात 4 टक्क्यांची वाढ होणार आहे. जर असे झाले तर त्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होईल. सरकारकडून वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते.
दोनवेळा केला जातो भत्ता
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकारकडून भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. काही महिन्यांपूर्वी यात वाढ केली होती. अशातच आता दुसऱ्यांदा महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे.
जानेवारीत केला पहिला बदल
महागाई भत्त्याच्या दराचे पुनरावलोकन वर्षातून दोनवेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात करण्यात येते. जानेवारीऐवजी मार्च महिन्यात पहिली भाडेवाढ जाहीर केली आहे. जरी असे झाले असले तरी त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनच देण्यात आला आहे. म्हणजेच जानेवारी २०२३ पासूनच कर्मचाऱ्यांचे अशातच आता तसेच आगामी दरवाढ जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.
निकष
महागाई भत्ता वाढवण्यासाठी, सरकार अखिल भारतीय CPI डेटा अर्थात AICPI निर्देशांकची मदत घेत असून ज्याचे आकडे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कामगार ब्युरोद्वारे जारी करण्यात येतात.
30 जूनला समोर येणार महत्त्वाचा आकडा
फेब्रुवारी महिन्यामध्ये AICPI निर्देशांक 132.7 अंकांवर होता. तर जानेवारीत हा निर्देशांक 132.8 अंकांवर होता. दरम्यान आत्तापर्यंतची आकडेवारी एप्रिलपर्यंत उपलब्ध असून त्यानंतर AICPI निर्देशांक 134.2 अंकांवर राहिला आहे. जानेवारीमध्ये महागाई भत्ता दरांमध्ये सुधारणा झाल्यापासून, AICPI निर्देशांक सुमारे 1.5 अंकांनी वाढवण्यात आला आहे. मे महिन्याचा निर्देशांक 30 जून रोजी जाहीर होणार असून यावेळीही निर्देशांक वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर आतापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार महागाई भत्त्यामध्ये सुमारे ३ टक्क्यांनी वाढ होईल. तर दुसरीकडे मे महिन्यातील वाढ पाहता महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढीचा अंदाज बळकट होतो.
पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 42 टक्के असून आता त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता 46 टक्के होईल. अशाप्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला पुन्हा वाढणार असून या महागाई भत्त्यासोबत, महागाई सवलतीतही बदल आहे. केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना डीआरचा लाभ दिला जाणार आहे.
एक कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार फायदा
एकूण 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ दिला जात आहे. तर एकूण 69.76 लाख पेन्शनधारकांना महागाई सवलतीचा लाभ दिला आहे. DA ची गणना मूळ वेतनाचा भाग म्हणून करण्यात येते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 23,500 रुपये असल्यास त्याला सध्याच्या 42 टक्क्यांच्या आधारे प्रत्येक महिन्याला 9,870 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. तर मार्चच्या वाढीपूर्वी त्यांना 8,930 रुपये महागाई भत्ता मिळत होता. तसेच त्यांचा मासिक टेक होम पगार 940 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.