DA Update : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच तुमच्या खात्यात जास्त पैसे येणार आहेत. कारण सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर याचा लाभ लाखो कर्मचाऱ्यांना होईल. महत्त्वाचे म्हणजे याचा लाभ फक्त कर्मचारीच नाही तर पेन्शनधारकांनाही होईल.
कोरोना काळात या कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी रखडली आहे. लवकरच हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. जरासे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होईल. त्यांच्या खात्यात जास्त पैसे जमा होतील.
तर दुसरीकडे, राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी याबाबत मंत्रिमंडळात एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, लवकरच महागाई भत्त्याचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील.
अधिकाऱ्यांची झाली चर्चा
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, या थकबाकीबाबत कर्मचाऱ्यांच्या वतीने अनेकदा मागणी केली आहे. तसेच अर्थ मंत्रालय आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये या बाबत अनेक चर्चा झाल्या आहे. या वर्षात सरकार हे पैसे थेट खात्यात वर्ग करू शकते, असे मानण्यात येत आहे.
त्याशिवाय केंद्र सरकार या प्रकरणी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण सध्या तरी सरकारने कोणतेही निवेदन जारी केले नाही किंवा हे पैसे देण्याबाबत कोणतेही संकेत देण्यात आले नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागणीमुळे सरकार लवकर हा निर्णय घेऊ शकते अशी अपेक्षा आहे.
खात्यात किती किती येणार पैसे?
हे लक्षात घ्या कर्मचाऱ्यांना हे पैसे तीन हप्त्यांमध्ये मिळू शकतील. कोरोनाच्या वेळी सरकारने 2020 ते जून 2021 पर्यंतचा महागाई भत्ता बंद केला आहे. कर्मचाऱ्यांचे थकित डीएचे पैसे भरण्यासाठी सरकारकडून संमती मिळेल. तसेच त्यांच्या खात्यात मोठी रक्कम येण्याची शक्यता आहे. लेव्हल-3 कर्मचार्यांची महागाई भत्ता थकबाकी रुपये 11,880 ते 37,554 रुपये असतील. अशा प्रकारे, लेव्हल-13 किंवा लेव्हल-14 कर्मचार्यांची डीए थकबाकी रु 1,44,200 ते रु 2,18,200 पर्यंत असेल.