आर्थिक

Dividend Stock : गुंतवणूकदारांना अतिरिक्त कमाईची संधी! रेल्वे शेअर्ससह ‘या’ कंपन्या देणार लाभांश, पहा लिस्ट

Dividend Stock : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण शेअरमार्केटमध्ये प्रत्येकवेळी नफाच मिळतो असे नाही. बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो.

जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. कारण एकही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहेत. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना एकदम लॉटरी लागली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपन्यांचे जास्त शेअर्स असतील तर त्यांच्या खात्यात खूप मोठी रक्कम जमा होईल.

या कंपन्या वितरित करतील लाभांश

गुजरात गॅसने गुंतवणूकदारांना आपल्या प्रत्येक शेअरवर 6.65 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ही कंपनी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यापार करेल. लक्ष्मी मिल्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 9 रुपये लाभांश जाहीर केला आहे. तसेच ही कंपनी 14 सप्टेंबर रोजी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यापार करेल.

अपोलो पाईप्स 15 सप्टेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये एक्स-डिव्हिडंड ट्रेड करू शकते. या कंपनीद्वारे आपल्या पात्र गुंतवणूकदारांना रु. 0.60 चा लाभांश देण्यात येणार आहे. आपल्या गुंतवणूकदारांसाठी रेल्वे स्टॉक इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनकडून 0.70 रुपयांचा लाभांश जाहीर करण्यात आला आहे. ही कंपनी 15 सप्टेंबर रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेड करेल.

तसेच जिंदाल स्टेनलेस द्वारे 1.15 रुपये लाभांश देण्यात येणार आहे. लाभांशाची विक्रमी तारीख 15 सप्टेंबर निश्चित केली आहे, हे लक्षात घ्या. आपल्या पात्र गुंतवणूकदारांसाठी मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून 19.09 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेकॉर्ड डेट 15 सप्टेंबर 2023 घोषित केली आहे.

या कंपन्या करणार एक्स-डिव्हिडंडचा व्यापार

दिलीप बिल्डकॉम, Asahi india gas, डायनॅमिक इंडस्ट्रीज, गरवारे टेक्निकल फायबर्स, जोस्ट इंजिनियरिंग कॉर्पोरेशन, लँडमार्क केअर्स, पोक्राना लिमिटेड, मनोरमा इंडस्ट्रीज, नितीन स्पिनर्स, परफेक्टपॅक लिमिटेड, प्रीमियर पॉलिफिल्म, स्टर्लिंग टूल्स आणि हिसार मेटल इंडस्ट्रीज या कंपन्या एक्स-डिव्हिडंडचा व्यापार करतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts