Diwali Bonus:- गेल्या कित्येक दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेला महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय अखेर घेण्यात आला असून महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे व आता केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळणार आहे.
सध्या दसरा आणि दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदी आणि गोड होणार आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकरिता दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे व 17 ऑक्टोबर 2023 रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 30 दिवसांच्या मूळ पगाराएवढी रक्कम आता मिळणार आहे.
त्यामुळे नक्कीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा दिवाळी बोनस हा वार्षिक बोनस असून ज्या कर्मचाऱ्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये कमीत कमी सहा महिने कुठलीही सुट्टी न घेता म्हणजेच अखंड सेवा दिलेली आहे अशा कर्मचाऱ्यांनाच हा दिवाळी बोनस मिळणार आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या इतर निकषांमध्ये जे कर्मचारी बसतील त्यांना देखील या दिवाळी बोनसचा लाभ दिला जाणार आहे.
कुणाला आणि किती प्रमाणात मिळेल बोनस?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार किती आहे या आधारावर निश्चित केली जाते. याकरिता जास्तीची मर्यादा ही 7000 रुपये आहे. गट ब आणि गट क श्रेणीतील सर्व अराजपत्रित कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे. याचा अर्थ अंदाजे 38 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवाळी बोनस लाभ मिळणार आहे. तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील कर्मचाऱ्यांना देखील या दिवाळी बोनसचा फायदा मिळणार आहे.