DA Hike Update:- महागाई भत्ता वाढीबाबत अनेक दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर अनेक माध्यमातून चर्चा सुरू होती व त्या विषयाच्या बातम्या देखील येत होत्या. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये महागाई भत्त्यात केव्हा वाढ होईल आणि किती टक्के केली जाईल याबद्दल मोठ्या प्रमाणावर गोंधळ होता.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात या सणासुदीच्या कालावधीमध्ये वाढ केली जाईल असा एकंदरीत अंदाज होता त्या अंदाजानुसारच केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली व कर्मचाऱ्यांना बोनस देखील जाहीर केला आहे.
महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली असून या वाढीनुसार आता 42 टक्क्यांवरून महागाई भत्ता हा 46 टक्के होणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील 48.67 लाख कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देखील जाहीर करण्यात आलेला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 2023 या वर्षाचा विचार केला तर मार्च यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये प्रत्येकी चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली होती.
कधीपासून लागू होईल ही वाढ?
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, महागाई भत्ता वाढीचा लाभ हा एक जुलै 2023 पासून लागू होईल व ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत त्यावर आधारित सूत्रानुसार आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी खजिन्यावर वार्षिक 12857 कोटींचा भार पडणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे विभागाच्या 11 लाख 7346 अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला असून त्यामुळे आता 1969 कोटींचा देखील अतिरिक्त बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.
तसेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता दिवाळीच्या आधीच बिगर उत्पादकता आधारित बोनस जाहीर केला असून निमलष्करी दलांसह ग्रुप सी कर्मचारी आणि बिगर राजपत्रित ग्रुप बी दर्जाच्या अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.