आर्थिक

Demat Account : तुम्हीही डिमॅट खाते वापरता का?; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा…

Demat Account : स्टॉक मार्केटमधील शेअर्स खरेदी आणि साठवण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. जर तुमचेही डिमॅट खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, जर तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यामध्ये नॉमिनेशन पूर्ण केले नसेल तर तुम्हाला नंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित केली आहे. या मुदतीत तुम्ही डिमॅट खात्याची नोंदणी पूर्ण न केल्यास तुम्हाला नंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सेबीद्वारे अशी खाती गोठवली जातील. अशा परिस्थितीत तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही.

सेबीकडून डिमॅट खात्यात नामांकन पूर्ण करण्याची अंतिम मुदत आधीच अनेक वेळा वाढवली आहे. यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपत होती, परंतु २७ मार्च रोजी सेबीने अधिसूचना जारी करून ही मुदत वाढवली होती. यासाठी सेबीने गुंतवणूकदारांना ६ महिन्यांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हे काम अद्याप पूर्ण केले नसेल, तर ते लवकरात लवकर करा. नामांकन पूर्ण न झाल्यास, SEBI असे खाते निष्क्रिय करेल आणि नंतर नामांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.

डिमॅट खात्यात नॉमिनीचे नाव कसे जोडायचे?

-प्रथम डिमॅट खात्यामध्ये नामांकनाचे काम पूर्ण करण्यासाठी, प्रथम डीमॅट खात्यात लॉग इन करा.

-यानंतर, प्रोफाइल विभागात My Nominees चा पर्याय निवडा.

-नंतर Add Nominee किंवा Opt-out पर्याय निवडा.

-यानंतर नॉमिनीची माहिती जोडा. नॉमिनीचा कोणताही आयडी पुरावा येथे अपलोड करा.

-यानंतर नॉमिनीची शेअर टक्केवारी निवडा.

-त्यानंतर दस्तऐवजावर ई-स्वाक्षरी करा आणि आधार ओटीपी प्रवेश करा.

-यानंतर, पडताळणी प्रक्रियेला 24 ते 48 तास लागतील आणि त्यानंतर नावनोंदणीचे काम पूर्ण होईल.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts