Bank Locker : देशातील बहुतांश बँका ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा पुरवतात. त्या बदल्यात, बँका ग्राहकांकडून भाडे आकारतात, जे प्रत्येक बँकेनुसार बदलते. अनेकवेळा काही कारणाने बँक लॉकरमध्ये ठेवलेले सामान गायब झाल्याचे दिसून येते. असे झाल्यास ग्राहकांना किती नुकसान भरपाई मिळेल? याबाबत ग्रहांकच्या मनात प्रश्न कायम असतो. आजच्या बातमीद्वारे आपण याबाबतचा नियम जाणून घेणार आहोत.
बँक लॉकरमधून सामान चोरी झाल्यास किती भरपाई दिली जाते?
बँक लॉकरयामध्ये ठेवलेल्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी बँकेची असते. अशा परिस्थितीत जर बँकेच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या लॉकरचे काही नुकसान झाले तर त्याला बँक जबाबदार असते आणि तुम्हाला योग्य ती भरपाई दिली जाते.
त्याच वेळी, चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळल्यामुळे तुमचे सामान बँकेच्या लॉकरमधून गहाळ झाल्यास, नियमानुसार, लॉकरच्या भाड्याच्या 100 पट रक्कम तुम्हाला बँकेकडून नुकसानभरपाई म्हणून दिली जाईल. उदाहरणार्थ, जर तुमचे लॉकचे भाडे 3,000 रुपये असेल, तर चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळल्यामुळे बँक लॉकरमधून वस्तू हरवल्यास, तुम्हाला 3,00,000 रुपये नुकसानभरपाई म्हणून दिली जातील.
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या आवारात चोरी, दरोडा आणि इमारत कोसळण्याची कोणतीही घटना घडू नये याची खात्री करणे ही शाखेची जबाबदारी आहे. त्याच वेळी, वर नमूद केलेल्या कारणांमुळे किंवा कर्मचाऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे बँकेच्या आवारात असलेल्या लॉकरमधून वस्तू गायब झाल्यास, बँक ग्राहकाला लॉकरच्या भाड्याच्या 100 पट रक्कम भरपाई देते.