आर्थिक

मायनस 100 चा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? आयुष्यामध्ये पैशांच्या बाबतीत समृद्ध राहण्यासाठी ठरेल फायद्याचा

Minus 100 Formula:- प्रत्येकजण वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असतात व संतुलित असा गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे हे खूप महत्त्वाचे असते. परंतु गुंतवणूक करताना आर्थिक नियोजन देखील तितकेच गरजेचे असते व तुमची जे काही उत्पन्न आहे त्यामधून कशाकरिता किती खर्च करावा? याचे नियोजन करणे खूप गरजेचे असते व यालाच आपण आर्थिक नियोजन असे देखील म्हणतो.

या दृष्टिकोनातून जर बघितले तर तुम्हाला जर तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ संतुलित ठेवायचा असेल तर मायनस 100 चा नियम किंवा सूत्र तुम्हाला खूप मदत करू शकते. हे एक साधे परंतु तितकेच प्रभावी असे सूत्र आहे व तुम्हाला तुमची मालमत्ता योग्य रीतीने मॅनेज करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करते.

या फार्मूल्यामध्ये तुमचे जे काही वय असेल ते 100 मधून वजा करावे लागते व जे उत्तर येते ते तुमच्या एकूण इक्विटीमध्ये गुंतवलेल्या पोर्टफोलिओची टक्केवारी असते व उरलेले उत्पन्न तुम्ही कर्ज किंवा निश्चित उत्पन्न ज्याठिकाणून मिळेल अशा साधनांमध्ये गुंतवणे गरजेचे असते.

मायनस 100 हा फॉर्म्युला कसे काम करतो?
हा फार्मूला जर समजून घ्यायचा असेल तर आपण एक उदाहरण घेऊ व त्या उदाहरणांनुसार जर तुमचे वय आता तीस वर्षे असेल तर 100 मधून 30 वजा म्हणजे 70 हे उत्तर येते.

या उत्तरानुसार तुम्ही तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी 70% इक्विटी जसे की (स्टॉक किंवा म्युच्युअल फंड) यामध्ये गुंतवावे आणि उरलेली 30% रक्कम ही कर्ज किंवा इतर निश्चित उत्पन्नाचे स्त्रोत जसे की एफडी, बॉण्ड्स किंवा पीपीएफ सारख्या योजने करिता वापरावे.

समजा तुमचे वय आता पंचवीस वर्षे असेल तर शंभर मधून 25 वजा केले तर उत्तर राहते 75 व या सूत्रानुसार बघितले तर यामध्ये मग तुम्हाला तुमचे उत्पन्न जर एक लाख रुपये असेल तर त्यातील 75 हजार रुपये गुंतवणूक इक्विटीमध्ये म्हणजेच एफडी किंवा म्युच्युअल फंड्स यासारख्या गुंतवणूक पर्यायांमध्ये करणे गरजेचे आहे

व उरलेली 25 हजार रुपयाची रक्कम तुम्ही कर्ज किंवा इतर एफडी किंवा पीपीएफ योजनेसारख्या निश्चित उत्पन्नाच्या साधनांमध्ये गुंतवणूक गरजेचे आहे. अशाप्रकारे प्रत्येक वयाच्या बाबतीत फार्मूला वापरून गुंतवणुकीचे एक सूत्र ठरवता येते.

हे सूत्र फायद्याचे का आहे?
या सूत्रानुसार जर गुंतवणुकीचे नियोजन केले तर वयानुसार तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ शिल्लक राहतो व जसे जसे तुमचे वय वाढत जाते तसा तसा धोका कमी होतो. तुमचे वय कमी असताना तुम्ही इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक केल्यामुळे तुमचे संपत्ती वेगाने वाढण्यास मदत होते.

तुम्ही निवृत्तीच्या जवळ असाल व हा फार्मूला वापरून जर गुंतवणुकीचा प्लॅन बनवला तर तुमच्याजवळ डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये अधिक गुंतवणूक केल्यामुळे आर्थिक स्थिरता मिळते. हा फार्मूला तरुणांसाठी जोखीम घेण्याची आणि पैसे वेगाने वाढवण्याची संधी निर्माण करतो.

जर तुम्ही जास्त जोखीम घ्यायला तयार असाल तर तुम्ही तुमच्या इक्विटीची टक्केवारी वाढवू शकतात. म्हणजेच एकंदरीत पाहता तुम्ही तुमच्या वयानुसार योग्य गुंतवणूक योजना बनवण्यासाठी या फॉर्मुल्याचा वापर करू शकता

व तो प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याच्या गरजा आणि उद्दिष्टानुसार हा फॉर्मुला वापरणे गरजेचे ठरते. तसेच हा फॉर्म्युला तुम्हाला योग्य दिशेने गुंतवणूक करण्यास मदत करतो व त्याचे जर तुम्ही योग्य पालन केले तर तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ सुरक्षितच नाही तर नफ्याने देखील भरला जातो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts