Benefit Of ITR Filling:- कर भरणारे म्हणजेच करदात्यांकरिता आयटीआर दाखल करण्याचे अनेक फायदे आहेत. जे व्यक्ती आयकर स्लॅबमध्ये येत नाहीत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे करदायीत्व नाही. म्हणजेच अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा टॅक्स वगैरे भरावा लागत नाही.
परंतु तरीदेखील तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरला तर त्याचे भविष्यात तुम्हाला अनेक फायदे मिळतात.बरेच आर्थिक तज्ञ म्हणतात की,जे लोक टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत तरी देखील त्यांनी आयटीआर भरणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक फायदे मिळतात. आर्थिक नियोजन किंवा आर्थिक दृष्टिकोनातून आयटीआर भरणे खूप गरजेचे असते व ते तितकेच फायद्याचे देखील असते.
आयटीआर भरण्याचे फायदे
1- आयटीआर हा उत्पन्नाचा पुरावा आहे- टॅक्स रिटर्न हा कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नाचा एक ठोस पुरावा म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय किंवा इतर कोणत्याही स्त्रोतांमधून पैसे कमवत असाल तर आयटीआर भरणे तुमच्या उत्पन्नाचे एक अचूक कागदपत्र म्हणून ओळखले जाते व हा पुरावा तुम्हाला अनेक ठिकाणी फायद्याचा ठरतो.
2- भविष्यासाठी फायद्याच्या आर्थिक नोंदी- आयटीआर फाईल करणे हे तुमच्याकरिता मजबूत असे आर्थिक रेकॉर्ड तयार करते. तुम्हाला जर भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल किंवा कोणत्याही मोठ्या व्यवहारात सहभाग नोंदवायचा असेल तर आयटीआर रेकॉर्ड करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरते.
3- पटकन कर्ज मंजूर होते- होमलोन किंवा पर्सनल लोन तसेच कार लोन घ्यायचे असल्यास बँक तुमच्या उत्पन्नाचा विश्वसनीय पुरावा म्हणून आयटीआर कडे पाहतात किंवा आयटीआरला मानतात.जरी तुम्ही इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये येत नसला तरी आयटीआर भरले असेल तर तुमचे कर्ज पटकन मंजूर होते.
4- कर परतावा दाव्यासाठी उपयुक्त- जर तुमच्या उत्पन्नावर आधीच कर कापला गेला असेल आणि तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत नसाल तर आयटीआर दाखल करून तुम्ही त्या अतिरिक्त कराच्या परताव्याची मागणी करू शकतात. परंतु अशा पद्धतीचे मागणी जेव्हा तुम्ही आयटीआर फाईल करतात त्यानंतरच करता येते.
5- व्हिजासाठी आयटीआर आवश्यक- जर तुम्हाला विदेशात जाण्यासाठी व्हिजा करिता अर्ज करायचा असेल तर आयटीआर फायलिंग हा एक महत्त्वाचा कागदपत्र त्यासाठी लागतो.
तुमचे नेमकी आर्थिक स्थिती काय आहे हे त्या माध्यमातून नमूद होते. जे स्वतः काहीही कमावत नाहीत त्यांना त्यांच्या पालकांच्या आयटीआरची प्रत द्यावी लागू शकते. म्हणजेच एक प्रकारे व्हिसा मंजुरीसाठी देखील आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे.
6- कायदेशीर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून- आयटीआर दाखल केल्याने तुमच्या उत्पन्नाचा रेकॉर्ड कर विभागाकडे सुरक्षित राहतो. या माध्यमातून तुम्ही भविष्यात कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद किंवा तपास राहू शकतात.
7- तुमचे उत्पन्न निश्चिती किंवा प्रमाणीकरणासाठी उपयुक्त- समजा तुम्ही फ्रीलान्स काम करत असाल एखादा छोटासा व्यवसाय चालवत असाल किंवा एखाद्या अनियमित उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून पैसे कमावत असाल तर आयटीआर फायलिंग तुमचे उत्पन्न प्रमाणित करत असते. आयटीआर घर भाड्याने देणे तसेच गुंतवणूक करणे आणि इतर आर्थिक प्रक्रिया करिता उपयुक्त आहे.
8- व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त- जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असाल तर त्याकरता तुम्हाला एखाद्या सरकारी विभागाकडून करार मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी आयटीआर फाईल करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही सरकारी विभागांमध्ये कंत्राट घेण्याकरिता गेल्या पाच वर्षाचा आयटीआर आवश्यक असतो.
9- मोठ्या रकमेच्या विमा पॉलिसीसाठी- तुम्ही पन्नास लाख रुपये किंवा एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची विमा पॉलिसी खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याची आयटीआर पावती दाखवावी लागते.
खास करून एलआयसीमध्ये तुम्ही 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीची पॉलिसी घेतल्यास तुम्हाला आयटीआर कागदपत्रांची मागणी केली जाते. एवढा मोठ्या रकमेकरिता विमा काढण्यास तुम्ही पात्र आहात की नाही हे या माध्यमातून ठरवले जाते.
10- सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त- अनेक प्रकारच्या सरकारी योजनांमध्ये अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा विचारला जातो व आयटीआर दाखल केल्याने तुम्हाला या योजनांचा लाभ घेणे सोपे जाते.