Post Office : प्रत्येक व्यक्तीला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची आहे, जिथून त्यांना उत्तम परतावा तसेच सुरक्षितता देखील मिळेल. जर तुम्हीही अशाच एका गुंतवणूकदारांपैकी एक असाल तर तुम्ही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, येथिल योजना इतर योजनांपेक्षा सुरक्षित तसेच जास्त परतावा देणाऱ्या मानल्या जातात.
आज आपण पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत. जी तुम्हाला खात्रीशीर परताव्यासह अनेक चांगले फायदे देते. आम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्राबद्दल (Kisan Vikas Patra) बोलत आहोत, यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर दुप्पट नफा मिळतो. तसेच तुम्ही अगदी कमी कालावधीत तुमचे पैसे दुप्पट करता.
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना कोणत्याही गुंतवणूकदारासाठी 115 महिन्यांत त्यांची गुंतवणूक दुप्पट करण्याची हमी आहे. सध्या या योजनेवर ७.५ टक्के वार्षिक व्याज आहे. यातील चांगली गोष्ट अशी आहे की, कोणतीही व्यक्ती या योजनेत अगदी 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात.
ही योजना खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गुंतवणूक दुप्पट करणे हा या योजनेचा साधा उद्देश आहे. यामध्ये एकल आणि संयुक्त दोन्ही खाती उघडता येतात.
हे खाते गुघडण्यासाठी आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, KVP (Kisan Vikas Patra) अर्ज फॉर्म इत्यादी आवश्यक आहे. अनिवासी भारतीय या योजनेसाठी पात्र नाहीत.