आर्थिक

Personal loan : ‘या’ बँका देत आहेत कमी व्याजावर वैयक्तिक कर्ज, तयार ठेवा ‘ही’ महत्वाची कागदपत्रे !

Personal loan : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासली तर आपण वैयक्तिक कर्जाची मदत घेतो. वैयक्तिक कर्जाच्या गरजा वित्तीय संस्था पूर्ण करतात. वैयक्तिक कर्ज अचानक लागणाऱ्या पैशाची गरज भागवतात. जवळजवळ सर्व बँकांकडून वैयक्तिक कर्ज दिले जाते.

पर्सनल लोनद्वारे तुम्ही सहज मोठी रक्कम उभारू शकता. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे सर्व बँकांसाठी वेगवेगळे असतात. तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रथम वैयक्तिक कर्जावरील व्याजदर तपासले पाहिजे.

वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

जर तुम्ही पगारदार वर्गातील असाल तर तुम्हाला तुमच्या कंपनीचे पगार प्रमाणपत्र, 3 पगाराच्या स्लिप, आयडी प्रूफ, रहिवासी पत्ता यांची आवश्यकता असेल. जर तुम्ही आधीच बँकेचे ग्राहक असाल आणि KYC फॉलो करत असाल तर वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध होईल.

या 10 बँका देत आहेत सर्वात कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज

1 बँक ऑफ महाराष्ट्र 10.00%

2 बँक ऑफ इंडिया 10.25%

3 अॅक्सिस बँक 10.49%

4 IDFC फर्स्ट बँक 10.49%

5 HDFC बँक 10.50%

6 ICICI बँक 10.50%

7 SBI 10.55%

8 कोटक महिंद्रा बँक 10.99%

9 टाटा कॅपिटल 10.99%

10 बजाज फिनसर्व्ह 11.00%

या आधारावर वैयक्तिक कर्जाचे दर ठरवले जातात

वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर निकषांसह बँक आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. याशिवाय व्याजदरही परतफेडीच्या कालावधीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे, वैयक्तिक कर्जाची EMI रक्कम कालावधी आणि व्याजदरानुसार ठरविली जाते. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर बँका ठरवतात. कोणतीही बँक अर्जदाराला किमान 50,000 ते 30 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देऊ शकते. हे कर्ज 1 वर्ष ते 5 वर्षांसाठी दिले जाते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts