FD Interest Rate : सध्या सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष्य त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला आणि हमी परतावा मिळवणे हे आहे. जर तुम्ही असेच गुंतवणूकदार असाल तर आम्ही आज तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडीबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. इथे गुंतवणूक केल्यावर तुम्हाला किती परतावा मिळेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण SBI FD मध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक किती फायदा मिळेल. चला जाणून घेऊया…
SBI FD व्याजदर
7 दिवस ते 45 दिवस – 3.00%
180 दिवस ते 210 दिवस – 5.25%
211 दिवसांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी – 5.75%
1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी – 6.80%
2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी – 7.00%
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – 6.50%
5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत – 6.50%
400 दिवसांची अमृत कलश ठेव योजना – 7.10%
ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे व्याजदर
या सर्व FD योजनांवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज मिळते. 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या योजनांवर 1 टक्के अधिक व्याज उपलब्ध आहे.
तुम्हाला 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ‘इतका’ मिळेल परतावा !
जर तुम्हाला SBI FD मध्ये 5 लाख रुपये जमा करायचे असतील तर तुमची रक्कम 1, 2, 3, 5 आणि 10 वर्षात इतकी वाढेल.
1 वर्षापर्यंतच्या FD वर 5.75% व्याजासह – 5,29,376 रुपये
2 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.80% व्याजासह – 5,72,187 रुपये
3 वर्षांपर्यंतच्या FD वर 7.00% व्याजासह – 6,15,720 रुपये
5 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.50% व्याजासह – 6,90,210 रुपये
10 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.50% व्याजासह – 9,52,779 रुपये
ज्येष्ठ नागरिकांना SBI FD वर इतका परतावा मिळेल !
6.25% व्याजासह 1 वर्षापर्यंतची FD – 5,31,990 रुपये
2 वर्षांपर्यंतच्या FD वर 7.30% व्याजासह – 5,77,837 रुपये
3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.50% व्याजासह – 6,24,858 रुपये
5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.00% व्याजासह – 7,07,389 रुपये
7.50% व्याजासह 10 वर्षांपर्यंतची एफडी (एसबीआय केअर एफडी योजना) – 10,51,175 रुपये.