Epf Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संस्था असून भविष्य निर्वाह निधीच्या दृष्टिकोनातून या संघटनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या पगारामधून ठराविक रक्कम पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी करिता कापली जाते व त्याच प्रमाणामध्ये काही रक्कम ही आपली नियोक्ता कंपनी आपल्या पीएफ खात्यात जमा करत असते व या रकमेचे सगळे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते.
या दृष्टिकोनातून आपण पाहिले तर प्रत्येक संघटना किंवा संस्था असो त्यांचे काहीतरी नियम असतात व तसेच नियम ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला देखील लागू होतात. या पीएफ खात्यामधून कर्मचारी बऱ्याचदा पैसे काढतात.7 परंतु त्यासाठी काही नियम व अटी देखील असतात. नेमके याबाबतीतले काय नियम व अटी आहेत तसेच पीएफ खात्यामधून पैसे काढल्यावर टॅक्स लागतो का? इत्यादीबद्दल माहिती घेणार आहोत.
कशा पद्धतीचे असते पीएफ खात्यातील योगदान?
ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा याला आपण प्रॉव्हिडंट फंड असे देखील म्हणतो. ही योजना किंवा हा फंड कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर आर्थिक उत्पन्न सुरू राहावे यासाठी या प्रॉव्हिडंट फंडाचे खूप महत्त्व आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम या पीएफ फंडामध्ये जमा करतात व 12 टक्के वाटा हा संबंधित कंपनीचा देखील असतो.
अशाप्रकारे पीएफ फंडमध्ये जो काही पैसा जमा होतो त्या जमा रकमेवर सरकारच्या माध्यमातून व्याज दिले जाते. याप्रमाणे जर आपण प्राप्तीकर विभागाची भूमिका पाहिली तर बँक खात्यातून जे काही उत्पन्न मिळते त्यावर प्राप्तिकर विभागाकडून व्याज किंवा घर भाडे इत्यादींवर देखील टॅक्स वसूल केला जातो. त्याच पद्धतीने पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर देखील टॅक्स आकारला जातो.
काय आहेत पीएफ अर्थात ईपीएफ खात्याचे नियम?
जर आपण ईपीएफ चे नियम पाहिले तर कर्मचारी जेव्हा फंडातून पैसे काढतो तेव्हा त्याला काही अटींची पूर्तता करणे गरजेचे असते. यामध्ये तुम्हाला पीएफ फंडातील पूर्ण जमा रक्कम काढता येत नाही. तुम्ही निवृत्त होता तेव्हाच तुम्हाला ही संपूर्ण रक्कम काढता येऊ शकते.साधारनपणे ईपीएफओच्या नियमानुसार वयाची 55 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे.
कोणत्याही कर्मचाऱ्याला निवृत्ती पूर्वी जर ईपीएफ मधून पैसे काढायचे असेल तर तो एकूण जमा रकमेच्या 90% रक्कम काढू शकतो.समजा काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली तर तो त्याच्या फंडामधून पहिल्यांदा 75 टक्के आणि दुसऱ्या वेळेला संपूर्ण रक्कम काढू शकतो. परंतु याकरिता देखील काही महत्त्वाचे कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते व अटी पूर्ण केल्यावर अशा पद्धतीने पैसे काढता येतात.
पीएफ खात्यातून पैसे काढल्यावर टॅक्स लावला जातो का?
ईपीएफ खात्यावर कोणत्याही प्रकारचा कर नसल्याचे साधारणपणे सांगितले जाते. यामध्ये प्राप्तिकर कायदा 80c अंतर्गत कर कपातीचा दावा करता येऊ शकतो. कर्मचाऱ्यांचे जे काही पीएफ खात्यातील योगदान आहे त्यावर किंवा इतर कोणत्याही स्त्रोतातून मिळालेले व्याज करपात्र असेल तर त्यावर कर आकारला जातो.
तसेच कंपनीने जे काही योगदान पीएफ खात्यात दिलेले असते त्यावर मिळणारे व्याज देखील पूर्णपणे करपात्र आहे. जेव्हा एखादा कर्मचारी कंपनीमध्ये पाच वर्षे काम करण्यापूर्वी जर त्याने पीएफ खात्यातून पैसे काढले तर त्याचा टीडीएस कापला जातो. परंतु पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो त्या कंपनीत काम करतो आणि त्यानंतर जर त्यांनी पीएफ फंडातून पैसे काढले तर त्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही.