EPFO New Rule:- खाजगी क्षेत्र असो किंवा सार्वजनिक क्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या महिन्याच्या पगारातून ईपीएस योजनेअंतर्गत पीएफ खात्यात काही योगदान द्यावे लागते व त्यातील काही योगदान हे नियोक्ता म्हणजेच ज्या कंपनीमध्ये आपण काम करत आहात त्या कंपनीच्या माध्यमातून देखील दिले जाते.
या सगळ्या पीएफ संदर्भात जर बघितले तर त्याचे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे साहजिकच पीएफ क्लेम असो किंवा या संबंधित असलेले काही महत्वाच्या आर्थिक बाबी असो यासंबंधीचे नियम हे ईपीएफओ करत असते व ते प्रत्येक कर्मचाऱ्याला बंधनकारक देखील असतात.
याच अनुषंगाने सध्या पीएफ काढण्यासंदर्भात म्हणजेच जर पीएफ क्लेम करायचा असेल तर त्यातील काही नियमांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बदल केला असून काही कर्मचाऱ्यांना पीएफ क्लेम करण्याकरिता आता आधार कार्ड अनिवार्य नसणार आहे.
परंतु हा जो काही नियम आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्याला लागू नसून फक्त काही विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आधार कार्डच्या संबंधित देण्यात आलेली ही सूट लागू असणार आहे.
पीएफ क्लेम संदर्भात या कर्मचाऱ्यांना नसणारा आधार कार्डची आवश्यकता
पीएफ क्लेम संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता काही श्रेणीतील कर्मचाऱ्यांकरिता युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात युएएन नंबर आधारशी लिंक करण्याची जी काही अट आहे त्यामध्ये सूट देण्यात आली आहे.
म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना आधार कार्ड मिळणे कठीण आहे किंवा त्यांना आधार सारखी इतर कागदपत्रे मिळू शकत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना आता ही सूट देण्यात येणार आहे व त्यामुळे आता नक्कीच या कर्मचाऱ्यांना पीएम क्लेम करण्यासंदर्भात खूप दिलासा मिळण्यास मदत होणार आहे व त्यांना दावा करणे सोपे जाणार आहे.
यामध्ये नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच जे कर्मचारी भारतामध्ये काम करून आपल्या देशात गेले आणि त्यांना आधार कार्ड मिळू शकलेले नाही असे कर्मचारी व त्याशिवाय परदेशी नागरिकत्व असलेले भारतीय त्यांना आधार कार्ड मिळू शकलेले नाही किंवा परदेशात कायमस्वरूपी गेलेली माजी भारतीय नागरिक, नेपाळ आणि भुतानच्या नागरिकांनाही या अंतर्गत सूट देण्यात आली आहे.
आधार नाहीतर कोणते अधिकृत ओळखपत्र द्यावे लागेल?
त्यामुळे पीएफ दावा दाखल करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना आधार कार्ड मध्ये सवलत देण्यात आली आहे. परंतु पासपोर्ट तसेच नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील किंवा इतर पात्रता निकषाद्वारे त्यांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच पाच लाख रुपयापेक्षा जास्त रकमेच्या दाव्याकरिता मालकाकडून सदस्याची सत्यता देखील पडताळली जाणार आहे.
तसेच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जे काही नियम तयार केले आहेत त्यामध्ये म्हटले आहे की, या प्रकारच्या कोणत्याही दाव्याची अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काळजीपूर्वक छाननी करणे गरजेचे आहे.
छाननी नंतर प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ई ऑफिस फाईलद्वारे मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना एकच युएन क्रमांक ठेवण्याचा किंवा मागील सेवेच्या नोंदी त्याच नंबरवर हस्तांतरित करण्याचा सल्ला दिला जातो व त्यामुळे क्लेम निवडणे देखील सोपे जाते.
या कर्मचाऱ्यांना नसणार आता आधार कार्डची आवश्यकता
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत रजिस्टर आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना या अंतर्गत आता सूट देण्यात आली आहे. यामध्ये ते कर्मचारी जे भारतात काम करून त्यांच्या देशात गेले आणि त्यांना आधार कार्ड मिळू शकलेले नाही
असे कर्मचारी व त्याशिवाय परदेशी नागरिकत्व असलेले भारतीय ज्यांना आधार कार्ड मिळू शकलेले नाही अशा कर्मचाऱ्यांना आता यामध्ये सुट देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना मात्र आधार कार्ड आवश्यक आहे.