EPFO News : सरकारी किंवा खाजगी ठिकाणी काम करत असलेल्या अनेक कमर्चाऱ्यांच्या पगारातून PF साठी काही टक्के रक्कम कापली जाते. कर्मचाऱ्यांना PF मधील रक्कम सेवा निवृत्तीनंतर दिली जात असते. मात्र तुम्ही काही आर्थिक अडचणीच्या वेळी देखील PF मधील रक्कम काढू शकता.
EPFO कडून PF खातेधारकांना ठराविक आर्थिक अडचणीच्या काळी PF खात्यातील रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. जर तुम्ही सेवानिवृत्तीपर्यंत हे पैसे काढले नाहीत तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निधी किंवा पेन्शन फंड दिला जातो.
तुम्हालाही मुलांचे शिक्षण, लग्न किंवा जमीन खरेदी करण्यासाठी PF खात्यातील पैसे काढायचे असतील तर तुम्ही सहज काढू शकता. तुम्ही तुमच्या PF खात्यातील रक्कम निवृत्ती अगोदरच काढू शकता.
मुलांच्या शिक्षणासाठी 50% रक्कम काढली जाऊ शकते
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून तुम्हालाही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवे असतील तर तुम्ही PF खात्यातील 50 टक्के रक्कम काढू शकता. मात्र तुम्ही EPFO खात्यात किमान सात वर्षे पैसे जमा केलेले असावेत.
तुम्ही निवृत्ती अगोदरच PF काढण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला फॉर्म 31 भरावा लागेल. तुम्हाला तुमच्या PF खात्यात लॉग इन करून फॉर्म 31 ऑनलाईन देखील भारत येईल. गृहकर्ज घेतले असेल आणि त्याची पूर्ण परतफेड करायची असेल तरीही तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकता.
पूर्ण निधी काढण्यासाठी फॉर्म 19 भरावा लागेल
तुम्ही PF खात्यातून संपूर्ण रक्कम देखील काढू शकता. यासाठी देखील काही नियम आणि अटी EPFO कडून जारी करण्यात आल्या आहेत. तुम्हाला गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी, कंपनी बंद पडली किंवा नोकरी गेल्यास तुम्ही PF खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकता. PF खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्यासाठी फॉर्म 19 भरावा लागेल. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील अर्ज करून पैसे काढू शकता.