EPFO Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ हे खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन तसेच इतर महत्त्वाच्या कामांचे नियमन करत असते. निवृत्तीवेतनधारकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्या निर्वाह निधीसाठीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये एपीएफओचे योगदान खूप मोठे आहे. ही एक कर्मचाऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची संघटना असून याच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून वाढीव पेन्शन चा पर्याय निवडलेल्या कर्मचाऱ्यांना आता यामुळे दिलासा मिळणार आहे.
वेतन तपशील
अपलोड करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीयाबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने वेतन तपशील अपलोड करण्याची शेवटची मुदत आता तीन महिन्यांनी वाढवली आहे. त्यामुळे आता ज्या कर्मचाऱ्यांनी जास्त निवृत्तीवेतनाचा पर्याय निवडलेला आहे अशा कर्मचाऱ्यांचा जो काही पगाराचा तपशील आहे तो संबंधित कंपन्या म्हणजे नियोक्ते हे एक डिसेंबर 2023 पर्यंत आता अपलोड करू शकणार आहेत.
याबद्दल केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून त्यानुसार 30 सप्टेंबर रोजी हा तपशील सादर करण्याची मुदत संपणार होती. परंतु आता कंपन्यांच्या अर्थात नियोक्ताच्या संघटनांच्या सूचनेनंतर आता ही मुदत वाढ देण्यात आली आहे. हे मुदत आता तब्बल तीन महिन्यांनी वाढवण्यात आली असून याची शेवटची तारीख आता 31 डिसेंबर 2023 असणार आहे व त्याला मान्यता देखील देण्यात आली आहे.
काय आहे वाढीव निवृत्ती वेतन योजना?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने इपीएस अंतर्गत वाढीव पेन्शन योजनेमध्ये काही बदल केले होते व या बदलातील नव्या तरतुदीनुसार वाढीव निवृत्ती वेतनाकरिता ज्या काही सदस्यांची निवड झाली आहे त्यांच्या पगारातून जास्तीचे 1.16 टक्के योगदान हे नियोक्ताच्या 12% च्या योगदानातून कट केले जाणार आहे.
अशा परिस्थितीमध्ये जर कर्मचाऱ्यांनी जास्त पेन्शनचा पर्याय निवडला तर ईपीएफ आणि ईपीएस साठी निधीचे वाटप हे समायोजित केले जाईल. त्यामुळे ईपीएफ भांडवलामध्ये घट होणार आहे. परंतु ईपीएस शिल्लक वाढणार आहे व त्याचा लाभ वाढीव पेन्शनच्या रूपात कर्मचाऱ्यांना होणार आहे.
आता जे काही नवीन नियम करण्यात आलेले आहेत त्यानुसार नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 3.67% पगार मर्यादेपर्यंत योगदान देईल आणि पगार मर्यादेपेक्षा 2.51% त्याच्या मूळ पगाराच्या ईपीएफ मध्ये योगदान जमा केले जाणार आहे. यामध्ये नियोक्ता म्हणजेच कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगार मर्यादेपर्यंत त्यांच्या मूळ पगाराच्या 8.33% आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 9.49% वेतन हे मर्यादेपेक्षा ईपीएस मध्ये जमा केले जाणार आहे म्हणजेच त्याचे योगदान देण्यात येणार आहे.