आर्थिक

EPFO Update: पीएफ खात्यातून 10 हजार काढले तर सेवानिवृत्ती निधीचे होईल 1 लाखांचे नुकसान! वाचा कोणत्या कामासाठी किती काढता येतो पैसा?

EPFO Update:- अनेक व्यक्ती सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करतात. नोकरी करत असताना आपल्याला महिन्याचे जे काही वेतन मिळते त्याच्यामधून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफकरिता योगदान म्हणून काही रक्कम कापली जाते व तितकीच रक्कम ही नियोक्ता कंपनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत असते.

अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडामध्ये पैसे जमा होत असतात. जर आपण या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफचा विचार केला तर सेवानिवृत्तीनंतर या पीएफ फंडात जमा झालेल्या पैशांचा खूप मोठा फायदा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळत असतो.

परंतु निवृत्तीच्या आधी नोकरी करत असताना देखील कर्मचाऱ्याला पीएफ फंडामधून पैसे ऑनलाईन पद्धतीने काढता येतात व तशी सुविधा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने पीएफ मधून पैसे काढले तर तुमच्या सेवानिवृत्ती निधीच्या एकूण रकमेचे नुकसान होऊ शकते. नेमकी तुम्ही किती रक्कम काढली तर सेवानिवृत्त निधीमध्ये किती नुकसान होऊ शकते? याबद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात घेऊ.

 पीए खात्यातून दहा हजार काढले तर सेवानिवृत्ती फंड वर किती परिणाम होईल?

जर आपण ढोबळमानाने अंदाज पाहिला तर समजा तुमच्या रिटायरमेंटला अजून तीस वर्षे बाकी आहेत व तुम्ही आता तुमच्या पीएफ खात्यातून तुम्हाला काही गरज असेल तर दहा हजार रुपये काढले. परंतु या दहा हजार रुपये तर तुम्ही आत्ता काढले तर तुमच्या सेवानिवृत्ती निधीवर तब्बल एक लाख 14 हजार रुपयांचा परिणाम होतो.

म्हणजेच आता काढलेल्या या दहा हजार मुळे तीस वर्षानंतर तुम्हाला मिळणाऱ्या सेवानिवृत्ती फंडमध्ये पैसे कमी मिळतात म्हणजेच तब्बल एक लाख 14 हजार रुपयांचा नुकसान यामध्ये होऊ शकते. अंदाजे जर आपण विचार केला तर वीस हजार रुपयाची रक्कम काढली तर वीस वर्षानंतर तुम्हाला तब्बल एक लाख एक हजार रुपये तर तीस वर्षांनी दोन लाख 28 हजार रुपये कमी मिळतील.

त्यासोबतच 50 हजार रुपये जर तुम्ही आता काढले तर वीस वर्षानंतर तुमचा सेवानिवृत्ती निधीतून दोन लाख 53 हजार रुपये कमी होतील व तीस वर्षांनी पाच लाख 71 हजार रुपये कमी होतील.

 पीएफ फंडातून कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकतात?

1- घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी तुम्हाला जर घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्याकरिता पीएफ फंडामधून पैसे काढायचे असतील तर त्याकरिता कर्मचाऱ्यांचे पाच वर्षे सतत सेवेत असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पीएफ फंडातून मासिक पगाराच्या 24 पट पैसे काढू शकतात. जर घर खरेदी आणि बांधकाम( दोन्ही) मध्ये तुम्ही मासिक पगाराच्या 36 पट रक्कम काढू शकतात.

2- वैद्यकीय उपचारांकरिता वैद्यकीय उपचारांकरिता पीएफ फंडामधून पैसे काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अट नसून याकरिता कर्मचारी हा त्याच्या योगदानाच्या बरोबरची रक्कम किंवा त्याच्या मासिक पगाराच्या सहापट यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम व्याजासह पीएफ खात्यातून काढू शकतो.

3- होम रेनोवेशन अर्थात घराची दुरुस्ती या कामासाठी तुम्हाला पीएफ फंडातून पैसे काढायचे असतील तर याकरिता घराचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून कर्मचारी पाच वर्षे सतत सेवेत असणे आवश्यक आहे. घराच्या दुरुस्ती करिता कर्मचारी त्याच्या पीएफ फंडामधून मासिक पगाराच्या बारा पट रक्कम काढू शकतो.

4- लग्नकार्य लग्नासाठी जर तुम्हाला पीएफ फंडातून पैसे काढायचे असतील तर त्याकरिता संबंधित कर्मचारी सात वर्षे सतत सेवेत असणे गरजेचे आहे. लग्नासाठी जर तुम्हाला पीएफ फंडामधून पैसे काढायचे असतील तर व्याजासह कर्मचाऱ्यांच्या योगदानाच्या 50% पर्यंत रक्कम काढली जाऊ शकते.

5- होमलोन पेमेंट होमलोन पेमेंट करायचे असेल व त्यासाठी तुम्हाला पीएफ फंडातून पैसे काढायचे असेल तर कर्मचाऱ्यांचे तीन वर्ष सतत सेवेत असणे गरजेचे आहे. याकरिता पीएफ फंडात एकूण जमा रकमेच्या 90 टक्के रक्कम काढता येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts