आर्थिक

EPFO Update : पीएफ सेवांमध्ये सुलभता यावी याकरिता ईपीएफओने सुरू केला ‘निधी आपके निकट उपक्रम’, वाचा माहिती

EPFO Update :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही एक महत्त्वाची संघटना असून विविध सरकारी कर्मचारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या संघटनेचे कार्य महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे निर्णय या माध्यमातून घेतले जातात. असाच एक महत्त्वाचा उपक्रम हा कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय आकुर्डी पुणे-2 यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. त्याबद्दलचेच महत्त्वाचे अपडेट या लेखात आपण घेणार आहोत.

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुरू केला

निधी आपके निकट अर्थात पीएफ नियर यू उपक्रम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने पुणे यांनी निधी तुमच्या निकट नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला असून त्यालाच पीएफ नियर यू असे देखील म्हटले गेले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य आणि लाभार्थी यांच्यासाठी असलेल्या सेवांमध्ये सुलभता यावी व सुविधा वाढवता याव्या याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

जर या उपक्रमाच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे जे काही उपक्रम आहेत किंवा ज्या सेवा आहेत त्या  सहजपणे सदस्यांना उपलब्ध करून देता याव्यात हा देखील यामागचा उद्देश आहे. ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय आकुर्डी पुणे-2 ने 28 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा संपर्क कार्यक्रमाचा एक भाग म्हणून निधी आपके निकट 2.0 हा मेसर्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्स्ट्रीक्यूशन मॅनेजमेंट अँड रिसर्च पोस्ट ऑफिस पुणे यांच्या सहकार्याने सुरू केला.

या कार्यक्रमादरम्यान ईपीएफओचे भागधारक तसेच सदस्य, पेन्शन धारक आणि इतर सहभागींना विविध पीएफ आणि पेन्शन संबंधित विषयावर महत्त्वाची माहिती देण्यात आली. या माहितीमध्ये तक्रारी सादर करण्याची प्रक्रिया तसेच फसवणूक प्रतिबंधक उपाय, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, विविध फॉर्मचे अपडेटेशन तसेच इ नामांकन प्रक्रिया, ऑनलाइन दावे तसेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र अपडेट करणे इत्यादी बऱ्याच गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच महत्त्वाचे म्हणजे पीएफ जमा करण्याच्या संबंधित ज्या काही संभाव्य फसवणुकीची घटना घडू शकते याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दक्षता जागरूक मोहिमेवर देखील या उपक्रमाच्या अंतर्गत प्रकाश टाकण्यात आला. निधी आपके निकट हा उपक्रम ईपीएफओ सदस्यांच्या बाबतीत सेवा आणि समाधान मिळावे या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असून या उपक्रमाच्या माध्यमातून कामकाजाचे आधुनिकीकरण तसेच डिजिटल परिवर्तन स्वीकारणे आणि सदस्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच ईपीएफओ सदस्यांना याचा फायदा होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts