EPFO Update:- यातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सहा कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसाठी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओकडून एक आनंदाची बातमी समोर आली असून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात लवकरात लवकर व्याजाची रक्कम ट्रान्सफर केली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे देशातील सहा कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना या व्याजाच्या रकमेचा लाभ मिळणार आहे. आगामी येऊ घातलेल्या सणासुदीच्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून ही एक मोठी भेट असल्याचे मानले जात असून सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे व्याजाची रक्कम हस्तांतरित करण्याची घोषणा जरी झालेली नसली परंतु अनेक प्रसार माध्यमांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार ती लवकरात लवकर ट्रान्सफर होईल अशी एक शक्यता आहे.
सहा कोटी पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार व्याजाची रक्कम?
प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खातेदार अर्थात पीएफ कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट असून केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2022- 2023 मध्ये 8.15 टक्के व्याज जाहीर केले असून अगोदर सरकारने 8.5% व्याजाची रक्कम हस्तांतरित केली होती. परंतु या व्याजाच्या दरात केंद्र सरकारने वाढ करत ते व्याज आता 8.15 टक्के दराने मिळणार आहे व ही रक्कम सहा कोटी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही एक महत्वपूर्ण बातमी असून सरकारच्या माध्यमातून सहा कोटी कर्मचाऱ्यांना ही एक मोठी भेट ठरणार आहे. याबाबतीत प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की नेमकी व्याजाची रक्कम किती येणार? तर याबाबतीत काही आकडेवारी समजून घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. या माध्यमातून अगोदर सहा लाख रुपये पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. नंतर 8.15 टक्के दराने सुमारे 50 हजार रुपये जमा करावे लागतील.
पीएफ खात्यामध्ये सात लाख रुपये असतील तर 8.15% दराने खात्यात 58 हजार रुपये जमा होतील. जर ईपीएफ खात्यामध्ये दहा लाख रुपयांची रक्कम असेल तर यामध्ये 82 हजार रुपये भरणे गरजेचे आहे. आपल्या खात्यात किती व्याजाचे रक्कम जमा झाली किंवा तुमचा पीएफ बॅलन्स किती आहे हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही उमंग एप्लीकेशन च्या माध्यमातून ते तपासू शकता.
याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातही ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन देखील तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकतात.