FD Interest Rate : नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. या महिन्यात देशात अनेक सण साजरे केले जातात. या काळात लोकांचा खर्चही खूप वाढतो. अशातच तुम्हालाही तुमच्यावर खर्चाचा बोजा वाढू नये असे वाटत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सणासुदीच्या काळात अशा अनेक सरकारी बँका आहेत ज्या गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर खूप चांगले व्याजदर ऑफर करत आहेत.
दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देत आहेत. तुम्ही या काळात बचत करून चांगला गुंतवणूक पर्याय शोधात असाल तर हि संधी तुमच्यासाठी उत्तम असेल. चला जाणून घेऊया या बँकांबद्दल ज्या तुम्हाला चांगला परतावा देत आहेत.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहे. हे तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहे. जर तुम्ही येथील एफडीमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांसाठी केली तर तुम्हाला 1.24 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळतो.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक (PNB) तीन वर्षांच्या FD वर ७ टक्के व्याज देत आहे. PNB च्या FD मध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.23 लाख रुपये होईल.
कॅनरा बँक
कॅनरा बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६.८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. कॅनरा बँक एफडीमध्ये 100,000 रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.22 लाख रुपये होईल.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक तीन वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. यामध्ये तीन वर्षांच्या एफडीमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक वाढून 1.21 लाख रुपये होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तीन वर्षांच्या FD वर 6.5 टक्के वार्षिक व्याज देत आहे. म्हणजे SBI FD मध्ये रु. 1,00,000 ची गुंतवणूक तीन वर्षात रु. 1.21 लाख होईल.