आर्थिक

FD Interest Rate: बँकेमध्ये एफडी करायचा प्लॅनिंग आहे का? वाचा कोणत्या बँकेत एफडी केल्याने मिळेल जास्त फायदा

FD Interest Rate:- प्रत्येक व्यक्ती कष्टाने कमावलेल्या पैशाची बचत करतो व या केलेल्या बचतीची गुंतवणूक करत असतो. गुंतवणूक करताना प्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दोन महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार करतो.

गुंतवणुकीचे पर्याय पाहिले तर प्रामुख्याने म्युच्युअल फंड एसआयपी, शेअर मार्केट तसेच विविध बँकांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या मुदत ठेवी अर्थात फिक्स डिपॉझिट होय. तसेच सरकारच्या माध्यमातून देखील अनेक लहान अशा बचत योजना राबवल्या जातात व त्या देखील गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत.

जर तुम्ही बँकेमध्ये एफडी करण्याचे ठरवले तर तुम्हाला त्या एफडीवर किती व्याज मिळेल व त्या अनुषंगाने मिळणारा परतावा या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. याच अनुषंगाने या लेखामध्ये आपण कोणत्या बँकेमध्ये एफडी केल्यावर जास्त फायदा मिळू शकतो? त्याबद्दलचे महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 कोणत्या बँकेत एफडी केल्यावर मिळेल जास्त फायदा?

सध्या जर आपण आयसीआयसीआय तसेच येस बँक व कोटक महिंद्रा बँकेचा विचार केला तर या बँकांनी मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात वाढ केलेली आहे. समजा तुम्ही येस बँकेमध्ये एफडी केली तर त्यावर तुम्हाला 7.75% पर्यंत व्याज मिळू शकते. जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बँक आणि पोस्ट ऑफिस च्या टाईम डिपॉझिट योजनांचा व्याजदराबाबत तुलनात्मक विचार केला तर  तुम्ही तुम्हाला आवडीच्या ठिकाणी एफडी करू शकतात.

 वेगवेगळ्या बँक त्यांचे व्याजदर

1- आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआय बँकेमध्ये जर तुम्ही एक वर्ष कालावधी करिता मुदत ठेव ठेवली तर तुम्हाला त्यावर आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून 6.70 टक्के इतका व्याजदर मिळतो. दोन वर्षासाठी एफडी केली तर 7.10%, तीन वर्षाकरिता सात टक्के आणि पाच वर्ष मुदतीकरिता एफडी केली तर सात टक्के इतका व्याजदर तुम्हाला मिळतो.

2- येस बँक येस बँकेमध्ये एक वर्ष कालावधी करिता तुम्ही एफडी केली तर तुम्हाला 7.25% इतका व्याजदर मिळतो. दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधी करिता तुम्ही येस बँकेमध्ये एफडी केली तर तुम्हाला 7.25% इतका व्याजदर दिला जातो.

3- कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा मध्ये तुम्ही एक वर्षाकरिता एफडी केली तर तुम्हाला 7.10 टक्के इतका व्याजदर मिळतो. तसेच तुम्ही दोन वर्ष कालावधी करिता फिक्स डिपॉझिट केली तर 7.10%, तीन वर्ष कालावधी करिता 6.50% आणि पाच वर्षे कालावधी करिता 6.20% इतका व्याजदर मिळतो.

4- स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयमध्ये जर तुम्ही एक वर्ष कालावधी करिता एफडी केली तर तुम्हाला 6.80%, दोन वर्ष कालावधी करिता सात टक्के, तीन वर्ष कालावधी करिता 6.50% आणि पाच वर्षे कालावधी करिता देखील 6.50 टक्के इतका व्याजदर मिळतो.

5- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये जर तुम्ही एक वर्ष कालावधी करिता एफडी केली तर तुम्हाला 6.90%, दोन वर्ष कालावधी करिता सात टक्के, तीन वर्ष कालावधी करिता सात टक्के आणि पाच वर्षे कालावधी करिता 7.50% इतका व्याजदर मिळतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts