FD Interest Rates : येस बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने एफडीवरील व्याजात 0.25 टक्के वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 21 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 120 महिन्यांपर्यंतची FD ऑफर करत आहे. बँक सामान्य नागरिकांना 3.25 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के ते 8.25 टक्के व्याज देत आहे.
सध्या बऱ्याच बँका एफडीवरील व्याजदरात कपात करत असताना येस बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करून ग्राहकांना खुश केले आहे. तुम्ही देखील सध्या चांगल्या परताव्याची आणि सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर तुमच्यासाठी या बँकेचा पर्याय उत्तम असेल. बँक आपल्या सर्व एफडीवर किती व्याज ऑफर करत आहे सविस्तर पाहूया…
येस बँक एफडीवर नवीन दर –
-7 दिवस ते 14 दिवस: 3.25 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 3.75 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-15 दिवस ते 45 दिवस: 3.70 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 4.20 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-46 दिवस ते 90 दिवस: 4.10 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 4.60 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-91 दिवस ते 120 दिवस: 4.75 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 5.25 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-121 दिवस ते 180 दिवस: 5% (सार्वजनिक)/ 5.50% (ज्येष्ठ नागरिक)
-181 दिवस ते 271 दिवस: 6.10 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 6.60 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-272 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: 6.35 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 6.85 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-एक वर्ष: 7.25 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 7.75 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-1 वर्ष ते 18 महिने: 7.25 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 7.75 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-18 महिने ते 24 महिन्यांपेक्षा कमी: 7.75 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 8.25 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-24 महिने 1 दिवस ते 36 महिन्यांपेक्षा कमी: 7.25 टक्के (सामान्य सार्वजनिक) / 7.75 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-36 महिने ते 60 महिने: 7.25 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 7.75 टक्के (ज्येष्ठ नागरिक).
-60 महिने: 7.25 टक्के (सामान्य सार्वजनिक)/ 8 टक्के (ज्येष्ठ नागरिक)
-60 महिने 1 दिवस ते 120 महिने: 7% (सामान्य सार्वजनिक)/ 7.50% (ज्येष्ठ नागरिक)