आर्थिक

Fixed Deposit : एफडीवर बंपर परतावा हवा असेल तर येथे करा गुंतवणूक, ‘ही’ बँक देत आहे 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज !

Fixed Deposit : आजच्या कळत प्रत्येकाला गुंतवणूक करण्याची आहे. कोरोना काळानंतर प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व समजले आहे. प्रत्येकाल आपली गुंतवणूक सुरक्षित तसेच चांगला परतावा देणारी पाहिजे. म्हणूनच आज प्रत्येकजण एफडीकडे वळत आहे. एफडी खाते उघडण्यासाठी बँक तसेच पोस्ट देखील परवानगी देते. एफडीमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशातच अनेक बँकांच्या मुदत ठेव योजना गेल्या काही काळात एक लोकप्रिय पर्याय बनल्या आहेत.

गेल्या वर्षी महागाईने कळस गाठल्यानंतर रेपो दरात एकापाठोपाठ एक वाढ होत असताना बँकांनी एफडीचे दर वाढवून ग्राहकांना दिलासा दिला आणि हा ट्रेंड अजूनही सुरूच आहे. अशीच एक बँक फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आहे जी त्यांच्या ग्राहकांना FD वर 9 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक शिवाय देशातील कोणतीच बँक FD वर 9 टक्क्यांहून अधिक व्याजदर ऑफर करत नाही.

जरी अशा अनेक बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना FD वर 9 टक्के व्याज देत आहेत, परंतु 9.21 टक्के व्याजदर ऑफर करून, Fincare Small Finance Bank सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँकांच्या यादीत सामील झाली आहे. लक्षात घ्या एफडीवरील हा उच्च व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी दिला जात आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणुकीवर सर्वाधिक ८.६१ टक्के व्याज दिले जात आहे. अलीकडेच, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरांमध्ये बदल जाहीर करून आपल्या ग्राहकांना भेट दिली होती.

750 दिवसांच्या गुंतवणुकीवर जास्त नफा मिळेल

मुदत ठेवींवर ९.२१ टक्के इतके मोठे व्याज मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बँकेत ७५० दिवसांची एफडी करावी लागेल. बँकेने केलेल्या बदलांनंतर, FD वरील नवीन व्याजदर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीसाठी एफडी दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत सध्या सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे व्याजदर पाहिल्यास, 7 दिवसांपासून ते 10 दिवसांच्या मुदत ठेवींवर, सामान्य ग्राहकांना 3 ते 8.61 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 3.60 टक्के ते 9.21 टक्के व्याजदर दिले जात आहेत.

नवीन व्याजदर

बँकेने नुकत्याच केलेल्या बदलांनंतर, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीवर दिले जाणारे व्याजदर पाहिल्यास, सामान्य नागरिकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के, 15 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज मिळू शकते. 30 दिवसांपर्यंत 4.50 टक्के व्याज, 31 ते 45 दिवसांच्या ठेवींवर 5.25 टक्के आणि 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 5.76 टक्के व्याज मिळत आहे.

बँक 91 ते 180 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के व्याज, 181 दिवस ते एक वर्ष म्हणजेच 365 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के व्याज आणि 12 ते 15 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 7.50 टक्के व्याज देत आहे.

‘या’ बँका एफडीवर देत आहे सार्वधिक व्याजदर

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक व्यतिरिक्त, अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर मजबूत व्याजदर देत आहेत. यामध्ये आघाडीवर युनिटी स्मॉल फायनान्स बँक आहे जी ज्येष्ठ नागरिकांना ९.५ टक्के व्याज देत आहे. तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 9.1 टक्के, DCB बँक 8.50 टक्के, RBL बँक 8.30 टक्के, IDFC फर्स्ट बँक 8.25 टक्के व्याज देत आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts