FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एक पारंपारिक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय. फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक ही कधीच बुडत नाही. यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे.
खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक मोठमोठ्या सरकारी आणि प्रायव्हेट बँकांच्या माध्यमातून एफडीच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे.
आता एफडीवर सरकारी आणि प्रायव्हेट बँकांकडून ग्राहकांना चांगले व्याज मिळू लागले आहे. यामुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. महिला वर्ग देखील आता फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.
दरम्यान, आज आपण तीन वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कुठली बँक सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या 5 बँका FD वर सर्वाधिक व्याज देतात
SBM बँक : एसबीएम बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 8.10% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 8.60% व्याज ऑफर करत आहे.
DCB बँक : DCB बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 8% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.50% व्याज देत आहे.
येस बँक : येस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.75% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3 वर्षाच्या FD वर 8.25% व्याज देत आहे.
ड्यूश बँक : आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या एफडीवर 7.75% व्याज देत आहे आणि तेच व्याज ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना देत आहे.
IndusInd बँक : आपल्या सामान्य ग्राहकांना 7.50% व्याज देत आहे आणि 3 वर्षाच्या FD वर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% व्याज देत आहे.