FD News : अलीकडे भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून अधिकचा परतावा मिळत असल्याने शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. परंतु आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आवडत नाही.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण आजही बँकेच्या एफडी योजनेत तसेच सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहेत. मात्र एफडी करू इच्छिणाऱ्या काही लोकांच्या माध्यमातून कोणती बँक एफ डी वर सर्वाधिक परतावा देते याविषयी विचारणा केली जात आहे.
यामुळे आज आपण एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या एका बँकेची माहिती पाहणार आहोत. एफडीवर सर्वाधिक 9.75 टक्के व्याज देणाऱ्या बँकेची माहिती जाणून घेऊया.
एफडीवर कोणती बँक देते सर्वाधिक व्याज?
नॉर्थ ईस्ट स्मॉल फाइनेंस बैंकेने अलीकडेच आपल्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. सध्या ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर तब्बल 9.75 टक्क्यांचे व्याज देत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या बँकेने एफडी व्याजदरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे.
यामुळे ज्या लोकांना एफडी करायची आहे त्यांना आता एफडी मधूनही चांगला परतावा मिळू शकणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना एफडीवर कमाल 9.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर कमाल 9.75% एवढ्या इंटरेस्ट रेटने व्याज देते.
ही बँक 546 दिवसांपासून ते 1111 दिवसांच्या FD साठी सामान्य ग्राहकांना 9.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.75% एवढे व्याज देते. खरे तर आधी याच कालावधीच्या एफडी साठी जेष्ठ नागरिकांना 9.25% आणि सामान्य ग्राहकांना 8.75% या रेटने व्याज दिले जात होते.
मात्र आता यामध्ये 0.50 टक्क्यांची वाढ झाली असल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे ही बँक एक वर्ष म्हणजे 365 दिवस ते 545 दिवसांच्या एफडीसाठीही चांगले व्याज देत आहे.
या बँकेच्या माध्यमातून या कालावधीच्या एफडी साठी सामान्य ग्राहकांना ८.७५% आणि जेष्ठ नागरिकांना 9.25% एवढे व्याज दिले जात आहे. एकंदरीत अल्प कालावधीत एफडी करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर नॉर्थ ईस्ट स्मॉल फाइनेंस बँकेचा पर्याय बेस्ट ठरणार आहे.
इतर राष्ट्रीय बँकांच्या तुलनेत ही स्मॉल फायनान्स बँक अधिकचा परतावा देत असल्याने गुंतवणूकदारांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे.