आर्थिक

FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक देणार तब्बल 9.5 % चे व्याजदर

FD News : आपल्यापैकी अनेकांचा नजिकच्या भविष्यात एफडी करण्याचा प्लॅन असेल. जर तुम्हीही अशाच विचारात असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. खरंतर, अलीकडे देशातील अनेक बँका एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत छोट्या स्मॉल फायनान्स बँका अधिकचे व्याजदर ऑफर करत आहेत.

यामुळे अनेकजण छोट्या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी करण्याला प्राधान्य दाखवत आहेत. विशेष म्हणजे अलीकडे बँकांनी एफडीवर चांगला परतावा देणे सुरू केले असल्याने महिला वर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात एफडी करत आहे हे विशेष. देशातील काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर तब्बल नऊ टक्के व्याज ऑफर करत आहे.

तसेच देशातील एक प्रमुख स्मॉल फायनान्स बँक एफ डी वर कमाल 9.50% या इंटरेस्ट रेटने व्याज देत आहे. दरम्यान आज आपण देशातील अशा काही प्रमुख बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडी वर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत.

या बँका FD वर देतात सर्वाधिक व्याजदर

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर अधिकचा परतावा देत आहे. ही बँक सीनियर सिटीजन ग्राहकांना कमाल 8.65% या रेटने व्याज ऑफर करत आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँकेपेक्षा जन स्मॉल फायनान्स बँक अधिकचे व्याजदर ऑफर करते. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 8.75 टक्के या इंटरेस्ट रेट ने व्याज देत आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : ही बँक ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना एफडीवर सर्वाधिक 9.10% या रेटने व्याज ऑफर करत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही देशातील एक प्रमुख स्मॉल फायनान्स बँक आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील एफडीवर जेष्ठ नागरिकांना 9.10% या इंटरेस्ट रेट ने व्याज देत आहे.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : मीडिया रिपोर्टनुसार नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपले एफडीचे व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेच्या नवीन इंटरेस्ट रेट नुसार सिनिअर सिटीजन ग्राहकांना बँकेकडून एफडीवर कमाल 9.50% रेटने व्याज मिळणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts