FD Rate Hike : गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध बँकांनी एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. ॲक्सिस बँक, कर्नाटका बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान देशातील आणखी एका बड्या बँकेने एफडीचे इंटरेस्ट रेट वाढवले आहेत.
त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने एफडी इंटरेस्ट रेट वाढवले आहेत.
यामुळे हजारो गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. विशेष बाब अशी की पंजाब नॅशनल बँकेने सुधारित केलेले हे नवीन रेट एक ऑगस्ट 2024 पासून लागू राहणार आहेत.
मात्र बँकेने फक्त तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. दरम्यान आता आपण पंजाब नॅशनल बँकेचे नवीन सुधारित दर कसे आहे त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
पीएनबी एफडीचे नवीन रेट
PNB ऑगस्ट महिन्यापासून एफडी साठी वाढीव दराने व्याज ऑफर करणार आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करते.
आता या एफडीवर बँकेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना ३.५० ते ७.२५ टक्के व्याज दिले जाणार आहे. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के ते 7.75 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे.
एवढेच नाही तर बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे 80 वर्षांवरील नागरिकांना कमाल 8.10 टक्के व्याज देणार आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून चारशे दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर केले जाणार आहे.
या कालावधीच्या FD मध्ये सामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.25 टक्के या इंटरेस्ट रेट ने व्याज मिळणार आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी म्हणजेच 65 वर्षांवरील नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 7.75% या इंटरेस्ट रेटने व्याज मिळणार आहे.
पण जर याच कालावधीच्या एफडी मध्ये सुपर सीनियर सिटीजन म्हणजेच 80 वर्षांवरील नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 8.10% या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जाणार आहे.
अर्थातच पंजाब नॅशनल बँकेची ही एफडी योजना सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना आगामी काळात एफडी मध्ये पैसा लावायचा असेल त्यांच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचा पर्याय सर्वोत्कृष्ट राहणार असा दावा केला जात आहे.