आर्थिक

FD Rate Hike : ग्राहकांची ‘चांदी’ ! ‘ही’ खाजगी बँक देत आहे FD वर 8.25% व्याज ; अशी करा गुंतवणूक

FD Rate Hike : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी एका खाजगी बँकेने एफडी वरील व्याज दरात वाढ केली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. यामुळे आता अनेक बँका ग्राहकांना एफडी दरात वाढ करून देत आहे.

तर आता आम्ही तुम्हाला सांगतो देशातील मोठ्या बँकांपैकी एक असणारी इंडसइंड बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे आणि हे नवीन व्याजदर 16 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत. तुमच्या माहितीसाठी हे जाणूनघ्या कि बँक सध्या सर्वसामान्यांना 3.5 टक्के ते 7 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 4.00 टक्के ते 7.50 टक्के व्याज मिळेल. बँक 7 दिवसांपासून ते 61 महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींवर हा व्याजदर देत आहे.

दोन वर्षांच्या FD वर 8.25 % व्याज

IndusInd बँक दोन वर्षे ते तीन वर्षे आणि तीन महिन्यांच्या FD वर सामान्य लोकांना 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के दराने व्याज देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 16 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या म्हणण्यानुसार, सात दिवस ते 30 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 3.50 टक्के दराने व्याज मिळेल. पुढील 31 दिवस ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 4.00 टक्के दराने व्याज मिळेल.

तीन वर्षांपेक्षा कमी FD वर व्याजदर

बँक एक वर्ष ते एक वर्ष आणि सहा महिन्यांच्या एफडीवर 7 टक्के आणि 1.6 महिने ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. बँक आता दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर जास्तीत जास्त 7.50 टक्के व्याजदर देत आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त परंतु 61 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 7.25 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. 61 महिने किंवा त्याहून अधिक मुदतीच्या FD वर सात टक्के दराने व्याज मिळेल.

120 दिवसांसाठी FD वर किती व्याज

91 ते 120 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 4.75 टक्के दराने व्याज मिळेल, तर 121 ते 180 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 5 टक्के दराने व्याज मिळेल. इंडसइंड बँक आता 211 दिवस ते 269 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 5.80% हमी व्याज दर देत आहे. इंडसइंड बँक 270 दिवस ते 354 दिवसांच्या FD वर 6% व्याज देत आहे. त्याच वेळी, 355 दिवस ते 364 दिवसांच्या ठेवींवर 6.25 टक्के व्याज मिळेल.

हे पण वाचा :-  Budh Gochar 2023: 8 दिवसांनी 4 ग्रह तयार करतील राजयोग ! ‘या’ राशीचे लोक होणार मालामाल

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts