आर्थिक

Senior Citizen FD : ऑक्टोबरमध्ये ‘या’ 9 बड्या बँकांनी बदलले एफडी दर; ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक फायदा !

Senior Citizen FD : ऑक्टोबर महिन्यात अनेक बँकांनी आपले FD दर सुधारित केले, काही बँकांनी एफडी दारात वाढ केली तर काही बँकांनी व्याजदरात घट केली. तसेच काही बँका आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत.

दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगत आहोत ज्यांनी अलीकडेच मुदत ठेवीवरील व्याज वाढवले ​​आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 9 बँकांनी एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. कोणत्या आहेत त्या बँका चला जाणून घेऊया.

युनिटी बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (युनिटी बँक) ने ७०१ दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना ९.४५% व्याज देत आहे. तसेच ७०१ दिवसांच्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.९५ टक्के व्याज दर ऑफर करत आहेत.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाने 3 वर्षांसाठी FD वर मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता बँका ज्येष्ठ नागरिकांना 2 ते 3 वर्षांच्या FD वर 7.9% पर्यंत व्याज देत आहेत. तिरंगा प्लस ठेव योजनेअंतर्गत, बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना 399 दिवसांच्या एफडीसाठी 7.8% व्याज देत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रने 46-90 दिवसांच्या ठेवींवर 125 bps म्हणजेच 1.25 टक्क्यांनी एफडी दर वाढवला आहे. बँक आता अल्प मुदतीच्या FD वर 3.50 टक्के ऐवजी 4.75 टक्के व्याज देत आहे.

कॅनरा बँक

कॅनरा बँकेने 5 ऑक्टोबरपासून एफडीचे दर सुधारित केले आहेत. आता बँक ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% पर्यंत व्याज देत आहे. तर सामान्य नागरिकांसाठी आधी जे व्याजदर होते तेच असणार आहे, एफडी व्यजदराबाबत अधिक माहिती असल्यास तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा बँकेत जाऊन चौकशी करू शकता.

येस बँक

4 ऑक्टोबरपासून, येस बँक ज्येष्ठ नागरिकांना 8% पर्यंत एफडी व्याज दर देऊ करत आहे. तुम्ही देखील येथे एफडी करून चांगला परतावा मिळवू शकता.

इतर बँका

1 ऑक्टोबरपासून, कर्नाटक बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.75% पर्यंत FD व्याजदर ऑफर करत आहे. तसेच इंडसइंड बँक 1 ऑक्टोबरपासून, ज्येष्ठ नागरिकांना 8.25% पर्यंत FD वर व्याज ऑफर करत आहे. तर IDFC First Bank ज्येष्ठ नागरिकांना 8% पर्यंत FD व्याजदर देत आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून, बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.75% पर्यंत व्याज देत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts