FD Rates : सध्या सर्वजण बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत, कारण येथील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तुम्ही देखील सध्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या बँकांचे एफडी दर जाणून घेणे महत्वाचे ठरेल. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच बँकांची नावे घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही एफडीवर चांगला परतावा मिळवू शकता.
मुदत ठेव हा कमी जोखमीचा गुंतवणूक पर्याय आहे. FD मध्ये ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते, ज्यावर पूर्व-निर्धारित व्याज मिळते. याशिवाय तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या FD वर कर वाचवू शकता. बँका FD वर व्याज दर नियमितपणे अपडेट करताना दिसत आहेत.
सध्या अनेक बँका आता सर्वसामान्य ग्राहकांना एफडीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याजदर देऊ करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेपो दरात वाढ रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकेनेही FD वर व्याजदर वाढवणे थांबवले आहे. मे 2022 पासून सलग सहा दरात एकूण 250 बेस पॉइंट्स किंवा 2.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर सेंट्रल बँकेने यावर्षी एप्रिलमध्ये दरवाढ थांबवली.
‘या’ बँकांनी आपल्या FD व्याजदरात सुधारणा केली आहे
अॅक्सिस बँक
अॅक्सिस बँकेने एफडीचे व्याजदर बदलले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे व्याजदर 18 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. अॅक्सिस बँक सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे.
IDBI बँक
आयडीबीआय बँकेने एफडीवरील व्याजदरातही बदल केला आहे. बँकेच्या अधिकृत पोर्टलनुसार, हे दर 15 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. आयडीबीआय बँक सामान्य ग्राहकांना सात दिवस ते पाच वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 3 टक्के ते 6.8 टक्के व्याज देत आहे. सात दिवस ते पाच वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7.3 टक्के.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँकेने सप्टेंबरमध्ये एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँक आता सात दिवस ते दहा वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर सामान्य ग्राहकांसाठी 2.75 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना या मुदत ठेवींवर 3.25 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर मिळेल. हे दर 13 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.