FD Rates : सध्या बँका त्यांच्या FD वरील व्याजदरात सुधारणा करत आहेत, अशातच देशातील खाजगी क्षेत्रातील बँक RBLने देखील आपल्या एफडी दारात बदल केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त FD वर व्याज वाढवले आहे. सध्या तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवण्याच्या हेतून चांगला आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर येथे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमध्ये रेपो दरात कोणताही बदल केला नाही. मात्र, त्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात सुधारणा केली आहे. RBL बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. RBL बँक आता सर्वसामान्यांना सर्वाधिक 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याज देत आहे. हे नवे दर 16 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.
आरबीएल बँक एफडी दर
-7 दिवस ते 14 दिवस : सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४ टक्के
-१५ दिवस ते ४५ दिवस : सामान्य लोकांसाठी – ४.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के
-४६ दिवस ते ९० दिवस : सामान्य लोकांसाठी – ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५ टक्के
-6 महिन्यांच्या बरोबरीचे 91 दिवसांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के
-181 दिवस ते 240 दिवस : सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
-241 दिवस ते 364 दिवस : सामान्य लोकांसाठी – 6.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५५ टक्के
-३६५ दिवस ते ४५२ दिवस : सामान्य लोकांसाठी – ७ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
-15 महिने : सामान्य लोकांसाठी – 7.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.३० टक्के
-15 महिने 1 दिवस ते 725 दिवस : सामान्य लोकांसाठी – 7.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.३० टक्के
-725 दिवस : सामान्य लोकांसाठी – 7.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.०० टक्के
-कर बचत 5 वर्षांची FD – 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.60 टक्के
दरम्यान, बँक ऑफ बडोदानेही दिवाळीपूर्वी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी FD योजनांवरील व्याजदरात 50 bps ने वाढ केली आहे. तसेच कोटक बँक, ICICI बँक, एकडीएफसी बँकेने देखील त्यांच्या एफडी व्याजदरात बदल केले आहेत, या बँकांचे एफडी व्याजदर तपासण्यासाठी बँकांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.