Kotak Mahindra Bank : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने पुन्हा एकदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून, गुंतवणूकदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे. या बँकेने केलेली ही वाढ किती कालावधीच्या एफडीवर करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया.
कोटक बँकेने 3 वर्षे आणि त्यावरील परंतु 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याच वेळी, 4 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. कोटक बँकेने आज 11 डिसेंबर 2023 पासून एफडीवरील व्याजदरांमध्ये हा बदल लागू केला आहे.
7 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर
बँक सध्या 2.75 टक्के ते 6.20 टक्के व्याज देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. कोटक बँक सामान्य ग्राहकांना सर्वाधिक 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.
नवीन एफडी दर
7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 2.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.25 टक्के
15 दिवस ते 30 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.50 टक्के
31 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.75 टक्के
46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.00 टक्के
91 दिवस ते 120 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.50 टक्के
121 दिवस ते 179 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के
180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के
181 दिवस ते 269 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
271 दिवस ते 363 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
364 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7 टक्के
365 दिवस ते 389 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
390 दिवस (12 महिने 25 दिवस) – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.70 टक्के
23 महिने – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
3 वर्षे आणि अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
4 वर्षे आणि अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के
5 वर्षे आणि त्याहून अधिक आणि 10 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.70 टक्के.