FD Rates : सध्या तुमचाही गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता, तसेच तुम्हाला येथे सुरक्षितता देखील मिळते. आज आम्ही तुम्हाला एफडी बद्दल सांगणार आहोत, देशातील प्रत्येक बँक एफडी ऑफर करते, तसेच बँकांचे एफडी दर देखील वेगवगेळे असतात.
आज आम्ही तुम्हाला अशा बँकाबद्दल सांगणार ज्या आपल्या एफडीवर 9 टक्के पेक्षा जास्त व्याज ऑफर करत आहेत. RBI ने गेल्या एका वर्षात रेपो दरात 250 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यानंतर बँकांनीही व्याजदर वाढवले.
एफडीवर उत्तम परतावा देणाऱ्या बँका पुढीलप्रमाणे :-
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
या बँका सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी एफडी सुविधा देतात. ज्यामध्ये तुम्हाला तीन टक्के ते ८.६१ टक्के व्याजदर दिला जात आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 750 दिवस किंवा दोन वर्षांच्या कालावधीसाठी 8.61 टक्के दराने व्याज देत आहे. यानंतर, 751 दिवसांपासून ते अडीच वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर 8.15 टक्के व्याज दिले जात आहे.
युनिट स्मॉल फायनान्स बँक
ही बँक आपल्या ग्राहकांना 9 टक्के व्याज देत आहे. युनिट स्मॉल फायनान्स बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव सुविधा प्रदान करते. यासोबतच 1001 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज देत आहे. युनिट स्मॉल फायनान्स बँक 1002 दिवस ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.65 टक्के दराने व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही बँक एफडीवर ग्राहकांना चार टक्के ते ८.६० टक्के वार्षिक व्याज देत आहे. याशिवाय 2 वर्षे ते 3 वर्षे कालावधीसाठी 8.60 टक्के व्याज दिले जात आहे. हे दर ऑगस्ट २०२३ पासून लागू होतील.