FD Rates : सुरक्षित गुंतवणूक म्हणून एफडी सध्या लोकप्रिय पर्याय मानला जात आहे. देशातील सर्व बँका विविध कालावधीसाठी एफडी सुविधा देतात. तसेच वेगवगेळ्या बँकांचे एफडीवरील व्याजदर देखील वेगवगेळे आहेत. काही बँका एफडीवर ९ टक्क्यांपेक्षा जास्त तर काही बँका ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
अशातच बहुतेक गुंतवणूकदार शॉर्ट टर्म एफडी पर्याय शोधतात ज्यामध्ये त्यांना जास्त परतावा देखील हवा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तीन वर्षांच्या गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो. आज आम्ही अशा टॉप बँकांबद्दल माहिती देणार आहोत ज्या 3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ८.६ टक्के व्याज देत आहे. स्मॉल फायनान्स बँकांमधील 3 वर्षांच्या एफडीवरील हा सर्वोत्तम दर आहे. येथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.29 लाख रुपयांपर्यंत वाढते.
एयू स्मॉल फायनान्स बँक
स्मॉल फायनान्स बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या FD वर 8 टक्के व्याज देतात. येथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.27 लाख रुपये होईल.
DEUTSCHE बँक
विदेशी बँकांमध्ये, DEUTSCHE बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे. या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.26 लाख रुपये होईल.
डीसीबी बँक
DCB बँक तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याज देते. हे खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देत आहे. येथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७.२० टक्के व्याज देते. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होते.
बंधन बँक
बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि येस बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देतात. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.24 लाख रुपये होईल.