FD Rates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत या वेळीही रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. सेंट्रल बँकेने रेपो दरात वाढ न केल्यामुळे बँक मुदत ठेवींच्या (एफडी व्याजदर) व्याजदरात सध्या मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. असे असले तरी काही बँका अशा आहेत ज्या एफडीवर चांगला व्याजदर देत आहेत.
लघु वित्त क्षेत्रातील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेमध्ये एफडी करून, तुम्ही 9.15 टक्के पर्यंत वार्षिक परतावा मिळवू शकता. एवढा परतावा सध्या कोणतीही बँक ऑफर करत नाही. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेद्वारे मुदत ठेवींवर दिले जाणारे व्याज स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँक यांसारख्या मोठ्या बँकांपेक्षा खूप जास्त आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर 3 टक्के ते 8.51 टक्के व्याज देत आहे. तर, ते ज्येष्ठ नागरिकांना FD वर ३.६० टक्के ते ९.१५ टक्के व्याज देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 7 ते 14 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 3 टक्के, 15 दिवस ते 30 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 4.50 टक्के आणि 31 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 4.75 टक्के वार्षिक दराने व्याज देत आहे. ग्राहकांना 46 ते 90 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.25 टक्के व्याज, 91 ते 180 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.75 टक्के व्याज आणि 181 ते 365 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 6.50 टक्के व्याज मिळत आहे.
त्याचप्रमाणे, बँक 30 महिने आणि एक दिवस ते 999 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 8 टक्के व्याज देत आहे. 36 महिने आणि एक दिवस ते 42 महिन्यांच्या कालावधीतील FD साठी 8.51 टक्के व्याज दिले जात आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 42 महिने आणि एक दिवस ते 59 महिन्यांच्या मुदतीच्या बँक एफडीवर 7.50 टक्के व्याज देत आहे. सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीच्या FD वर 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळत आहे.