FD Scheme : जर तुम्हीही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आकर्षक एफडी योजना आणत आहेत, त्यामार्फत तुम्ही गुंतवणूक करून अधिक फायदे मिळवू शकता.
एफडी, म्हणजे मुदत ठेव, ही पूर्वीची बचत योजना मानली जाते. आजकाल बाजारात पैसे गुंतवण्याचा ट्रेंड आहे. पण आता आरबीआयने व्याजदरात सातत्याने वाढ केल्याने एफडीवरही चांगला परतावा मिळत आहे.
दरम्यान, HDFC बँकेने दोन नवीन मुदत ठेव FD योजना सुरू केल्या आहेत. बँकेच्या वेबसाइटवर लिहिले आहे की, ‘बँकेने दोन विशेष प्रकारच्या मुदत ठेव योजना काढल्या आहेत. पहिली योजना 2 वर्षे, 11 महिने म्हणजे 35 महिने आणि दुसरी योजना 4 वर्षे, 7 महिने म्हणजे 55 महिन्यांसाठी आहे.
बँकेच्या म्हणण्यानुसार, 35 महिन्यांच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज मिळेल आणि 55 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज मिळेल. पण एक चांगली गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फायदा होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज मिळणार असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एफडी घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे कारण बँकेचे म्हणणे आहे की या योजना मर्यादित कालावधीसाठी आहेत.
नवीन बदलांनुसार, बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3 ते 7.25 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या FD योजनांवर 3.5 टक्के ते 7.75 टक्के परतावा मिळेल. नवीन दर 29 मे 2023 पासून लागू झाले आहेत.
याशिवाय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर’ या एफडी योजनेचा विस्तार केला आहे. ज्येष्ठ नागरिक आता या योजनेत 7 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतील. 5 वर्षांसाठी 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाईल.
बँक आधीच ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज देते. अशाप्रकारे, ज्येष्ठ नागरिक काळजी योजनेंतर्गत एफडी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकूण 0.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. ही ऑफर परदेशात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लागू होणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांनी 5 वर्षापूर्वी एफडी तोडल्यास त्यांना निश्चित व्याजापेक्षा 1 टक्के कमी व्याज मिळेल. अशाप्रकारे, ग्राहकांना एक टक्का कमी व्याज मिळेल किंवा ज्या आधारभूत दरासाठी पैसे बँकेत जमा केले होते, त्या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल.
त्याच वेळी, 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD ब्रेकिंगवर निश्चित व्याजापेक्षा 1.25 टक्के कमी व्याज दिले जाईल. यापूर्वी, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियानेही ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेवींसाठी मुदत वाढवली आहे.