Federal Bank Scholarship:- समाजातील अनेक घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गुणवत्ता आणि क्षमता असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही. पैशांच्या अभावी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण हे अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात.
या योजनांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळतो व ते शिक्षण पुढे सुरू ठेवू शकतात. अनेक बँकांच्या माध्यमातून देखील उच्च शिक्षणाकरिता कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येतात व या एज्युकेशन लोन चा फायदा देखील विद्यार्थ्यांना होत असतो.
याच पद्धतीने जर तुम्ही फेडरल बँकेचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन स्कॉलरशिप देण्यात येत असून याकरिता आता 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता स्कॉलरशिप साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याच स्कॉलरशिप विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
या संस्थेकडून मिळेल उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता फेडरल बँकेच्या माध्यमातून फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन स्कॉलरशिप साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत स्कॉलरशिप प्रकल्प राबवण्यात येत आहे या स्कॉलरशिपच्या अंतर्गत एमबीबीएस, इंजीनियरिंग, एमबीए, बीएससी नर्सिंग तसेच कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून बीएससी ऍग्री सह बी एस सी( ओनर्स ) कोऑपरेशन अँड बँकिंगचं ॲग्री सायन्सेस इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
या स्कॉलरशिप साठी अटी
1- या स्कॉलरशिप साठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असावे.
2- देशासाठी बलिदान देणाऱ्या सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांचा वेगळ्या चॅनलने या माध्यमातून विचार केला जाणार असून या विभागाच्या अंतर्गत जे अर्जदार अर्ज करतील त्या विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक उत्पन्नाचे अट असणार नाही.
3- या स्कॉलरशिप करिता जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांनी मेरिट वर सरकारी/ अनुदानित/ सरकार मान्य सेल्फ फायनान्सिंग/ खाजगी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शैक्षणिक वर्ष 2023-24 ला प्रवेश घेतलेला असावा.
या स्कॉलरशिपची इतर महत्त्वाची माहिती
या स्कॉलरशिप साठी प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब या राज्यातील विद्यार्थी पात्र असतील व प्रत्येक क्षेत्रातील एक जागा ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना डीएमओ किंवा बँकेच्या मान्यता प्राप्त मेडिकल ऑफिसरकडून प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना दिव्यांग विभागातून अर्ज करता आला नाही तर अर्ज साधारण विभागांमध्ये गणला जाईल. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांचे शंभर टक्के शैक्षणिक फी आणि इतर शैक्षणिक कर्ज ही कॉलेजच्या फी नुसार देण्यात येणार आहे. याकरिता कमाल खर्च हा एक लाख रुपये प्रति वर्ष असणार आहे.
या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
या स्कॉलरशिप साठी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल असे विद्यार्थी 17 डिसेंबर 2023 या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.